मुंबई - खासदार संजय राऊत यांना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने विमा कवच व इतर सोयी सुविधा मिळण्याबाबत मुंबई ठाणे परीसरातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निवेदन.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*⭕मुंबई - खासदार संजय राऊत यांना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने विमा कवच व इतर सोयी सुविधा मिळण्याबाबत मुंबई ठाणे परीसरातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निवेदन.*


            आजमितीस कोरोना विषाणूचे संकट असतानाही वृत्तपत्र विक्रेते आपली सेवा पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असंघटित कामगार या वर्गात मोडणारे हे विक्रेते,आपली अत्यावश्यक सेवा अनेक संकटांचा व अडथळ्यांचा सामना करत नियमितपणे देतच असतात. ह्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना राज्य किंवा केंद्र सरकारने कोरोना पासून सामना करण्यासाठी विमा कवच देण्यात यावे अशी संघटनेच्या वतीने  विनंती करण्यात अाली.तसेच आपले कर्तव्य पार पाडताना येणारा पोलिसांचा अडथळा, पेट्रोल-डिझेल भरण्यास येणाऱ्या अडचणी, वर्तमानपत्रांचा स्टॉल लावण्यास परवानगी व अत्यावश्यक सेवेत आहोत हे दर्शविणारे कायमस्वरूपी ओळखपत्र अशा बाबींमध्ये आपण मदत केल्यास वृत्तपत्र विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळेल. आपली सेवा देण्यास ते  एका वेगळ्या उत्साहाने आपल्याकडून प्रेरित होऊन अधिक सक्षमपणे व जोमाने कार्यरत राहतील.
         *वृत्तपत्र विक्रेत्यांना या अस्मानी संकटामध्ये आपण मदत कराल असा आम्हाला विश्वास आहे.यावेळी  खासदार श्री संजय राऊत साहेब यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या बाबतीत मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या बरोबर चर्चा करून विक्रेत्यांना योग्य ती मदत करतो असे सांगितले* 
             *फोरम च्यावतीने श्री बाजिरावशेठ दांगट,श्री दिपक शिंदे व संघटनेच्या वतीने श्री संजय चौकेकर,श्री बाळा पवार, श्री हरी पवार, श्री मधूसुदन सदडेकर,श्री अजित पाटील,श्री जीवन भोसले, श्री रवी चिले, श्री हेमंत मोरे, श्री जयवत डफळे,श्री  मधू माळकर, श्री दिलीप  चिंचोळे,श्री बळवंत नलावडे व श्री घनशाम यादव उपस्थिती होते.*
        


*बृहन्मुंबई वृत्तपत्र वि संघ*


*हरी पवार*  *मधुसूदन सद्डेकर*