पुणे प्रवाह न्युज पोर्टल
झूमकारद्वारे सबस्क्रिप्शन प्रोग्राममध्ये ग्राहकांना सवलत
मुंबई, १९ एप्रिल २०२०: भारतातील सर्वात मोठा सेल्फ ड्राइव्ह मोबिलीटी मंच असलेल्या झूमकारने वाढलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सबस्क्रिप्शन प्रोग्राममध्ये ग्राहकांना पाठींबा देण्याचे ठरवले आहे. ग्राहकांचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीने सबस्क्रिप्शन प्रोग्राममध्ये तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
झूमकार सबस्क्रिप्शन फीमध्ये १ महिन्याची सवलत देईल. ती सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत असेल. त्यासाठी ग्राहकांना एप्रिल महिन्याची थकबाकी भरावी लागेल. मे महिन्यासाठीचे त्यांचे शुल्क माफ केले जाईल. ग्राहकांच्या खिशावरील ताण ओआणखी कमी करण्यासाठी दुसरा एक पर्याय आहे. त्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातील संपूर्ण लॉकडाउन काळात पूर्ण सवलत मिळेल. तसेच ते देय रकमेपैकी ५० टक्के रक्कम दोन महिने उशीराने भरण्याचा पर्यायही निवडू शकतात.
भविष्यकाळात ग्राहकांना सबस्क्रिप्शनबद्दल अनिश्चितता असेल तर कोणताही दंड न आकारता सबस्क्रिप्शन बंद करण्याचा पर्यायही झूमकार देत आहे.
झूमकारचे सीईओ आणि सह संस्थापक ग्रेग मॉरन म्हणाले, ‘कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. झूमकारच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना विना अडथळा वाहने पुरवण्याची खात्री देतो. या अनिश्चित काळात सहकार्याच्या भावनेतून आमच्या सबस्क्रायबर्सचे ओझे वाटून घेताना आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे अशा काळातील व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. या लवचिक सुविधांमुळे जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर ग्राहक आमच्या सेवांचा चांगल्या प्रकारे लाभ घेतील.”