पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*कोरोना आयसोलेशन साठी प्रार्थना स्थळ*
*उपलब्ध करण्याच्या निर्णयाचे स्वागत*
----------------------
पै आयसीटी अकॅडमी कडून डॉ.पी.ए.इनामदार यांचे आभार
पुणे :
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरच्या हॉट स्पॉट जवळ संशयित रुग्णांच्या आयसोलेशन साठी धार्मिक स्थळाची ९ हजार चौरस फूट जागा,सर्व सुविधांसह प्रशासनाला उपलब्ध करून देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल पै आयसीटी अकॅडमी या संस्थेने आझम कॅम्पस चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांचे आभार मानले आहेत.कोरोना साथीच्या संकटात सामाजिक जबाबदारी पेलण्याचे धैर्य दाखविल्याबद्दल आझम कॅम्पस अभिनंदनास पात्र आहे,असे अकॅडमी च्या संचालक मुमताज सय्यद यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रमजान च्या काळात धार्मिक स्थळावर नमाज पठण करण्यासाठी एकत्र येऊ नये,सुरक्षित अंतर ठेवण्याच्या प्रशासनाच्या नियमाचे पालन पुण्यात सर्व ठिकाणी व्हावे,यासाठीही डॉ पी ए इनामदार यांनी सर्व संबंधितांशी संवाद साधून कर्तव्य बजावल्याचा उल्लेख या पत्रकात मुमताज सय्यद यांनी केला आहे.
................................................