पुणे प्रवाह न्युज पोर्टल
देशात सुरू असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरीकांसाठी जीवाची परवा न करता अहोरात्र झटणाऱ्या पोलिस व प्रशासनाला यशवंतराव नडगम यांच्याकडून मानाचा मुजरा
सामाजिक नेते यशवंतराव नडगम यांच्यातर्फे वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी, पेट्रोल पंप वरील कर्मचारी, वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले पंधराशे पोलीस कर्मचारी यांना सैनी टायझर व मास्क देण्यात आले.
तसेच त्यांच्या प्रयत्नांनी हडपसर, घोरपडी गाव, मुंढवा भागातील गरीब मजूराणा लॉक डाऊन चालू झाल्यापासून आज पर्यंत दोन्ही वेळचे जेवण देण्यात येत आहे. लहान मुलांसाठी बिस्किट देण्यात येत आहे. रस्त्यावरील गाई, कुत्रे, मांजरी यासारख्या मुक जनावरांना सुद्धा त्यांचे खाद्य दररोज पुरविले जात आहे.
हडपसर गाडीतळ, रामटेकडी बीटी कवडे रोड, पिंगळे वस्ती, धायरकर वस्ती, मार्कंडेनगर येथे गरजुना भोजन वाटप यशवंतभाऊ नडगम यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी मुकेश वाघमारे, सोनालीताई नवदुग, लखन, राजू लांडगे, किरण ठोंगे, बाप्पू माने, नितीन जावळे, मुदस्सर शैख, अजय वंदगळ, लहू लांडगे, सुनील आंग्रे,वसंत गायकवाड, दीपक गायकवाड, मायकल क्लासो, भगवान राऊत, प्रशांत वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
हे सर्व कार्य यशवंतराव नडगम हे स्वतःच्या मेहनतीने आपली सामाजिक बांधिलकी म्हणून पार पाडीत आहेत. त्यांनी समाजातील दानशूर प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्याकरिता मदत करण्याचे आवाहन केले आहे. मदतीसाठी त्यांनी यशवंतराव नगर मित्र मंडळ घोरपडी गाव येथे संपर्क करावा असे कळविले आहे.