भारतीय रेल्वेमार्फत कोरोना बाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कोचमधील आयसोलेशन वॉर्डची  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*भारतीय रेल्वेमार्फत कोरोना बाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कोचमधील आयसोलेशन वॉर्डची  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी*
पुणे, दि.5: भारतीय रेल्वेमार्फत  पूर्वतयारी म्हणून  कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वार्ड तयार केले जात आहेत. 
     पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये साईसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे, आज
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आयसोलेशन सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करुन रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता विजयसिंग धडस, कोचिंग डेपो अधिकारी राहुल गर्ग आदी  उपस्थित होते.  
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोवीड-19 रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक बोगीत 16 ते 18 रुग्णांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात 50 कोच पुरविण्यात येणार आहे. यामध्ये 800 ते 900 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल.रेल्वेने या सुविधेत रुग्णांना सुविधा देण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल केले असून येत्या दोन दिवसात दोन कोच उपलब्ध होतील, उर्वरित कोच आठ दिवसात उपलब्ध होतील, असेही सांगून रेल्वेने निर्माण केलेल्या कोच सुविधेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी समाधान व्यक्त केले.
0000


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image