आपल्या लाडक्या "" तेंडल्यांचा "" आज २४ एप्रिल २०२०  ४७ व्या वाढदिवस निमित्ताने ,सर्व भारतीयांच्या वतीने मनपुर्वक शुभेच्छा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आपल्या लाडक्या "" तेंडल्यांचा ""


आज २४ एप्रिल २०२० 


४७ व्या वाढदिवस निमित्ताने ,सर्व भारतीयांच्या वतीने


मनपुर्वक शुभेच्छा



छायाचित्र शिवाजी हुलावळे


 



१) सचिन चे वडील रमेश तेंडूलकर हे सचिन देव बर्मन यांचे खूप मोठे चाहते होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव देखील त्यांच्याच नावाने ठेवले "सचिन".


 



२) पहिले सचिनला एक उत्तम गोलंदाज (Fast Bowler) बनायचे होते परंतु M.R.F फाउंडेशन च्या डेनिस लिली यांनी सन १९८७ मध्ये सचिन ला खरेदी केले आणि लिली यांनी सचिनला फक्त फलंदाजी (bating) वर लक्ष द्यायला सांगितले.


 



३) सचिन जेंव्हा दुसऱ्या खेळांडू बरोबर खेळाचा सराव करत असे तेंव्हा त्यांचे कोच स्टंप वर एक शिक्का ठेवत असत आणि दुसऱ्या खेळांडूना सचिन साठी बॉलिंग करायला लावत असे, आणि जो खेळाडू सचिन ला बाद करेल त्याला तो शिक्का देत असे. पण जर सचिन ला कोणीच बाद नाही करू शकला तर तो पैश्याचा शिक्का सचिन ला मिळत असे. सचिन यांच्या कडे आजही ते जमा झालेले १३ शिक्के आहेत.


 


 


४) सचिन गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही उजव्या हाताने खेळतात परंतु लिहितात मात्र डाव्या हाताने तसेच ते टेनिस देखील डाव्याच हाताने खेळतात.


 



५) १९८८ मध्ये मुंबई येथील ब्रेबोन स्टेडीयम मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये एक सराव सामना झाला होता त्यात सचिन ने पाकिस्तान साठी फिल्डिंग (Fileding) केली होती.


 



६) सचिन ने ७९ सामन्यानंतर पहिले एक दिवसीय शतक धावा मारले होते. परंतु या दरम्यात टेस्ट सामन्यामध्ये ७ वेळा शतक मारले होते.


 



७) २००८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मोहाली येथे सामना झाला होता तेंव्हा सचिन ने सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला होता. मैदानात इतका जल्लोष होता कि आतिशबाजी मुळे २० मिनिटे खेळ थांबविण्यात आला जेणे करून झालेला धूर निघून जाईल.


 



८) सचिन क्रिकेट क्षेत्रातील असे पहिले फलंदाज (batsman) आहेत ज्यांना third umpire (तिसरे पंच) यांनी बाद (out) घोषित केले. १९९२ मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या डरबन टेस्ट सामन्या मध्ये महान फिल्डर जॉटी रोड्स यांच्या गोलंदाजीने third umpire यांनी टीव्ही वर रिप्ले बघून सचिन ला बाद घोषित केले.


 



९) सचिन कधी कधी घरी आपली पत्नी अंजली व आपल्या मुलांसाठी नाश्ता बनवितात. एवढेच नव्हे तर १९९८ मध्ये सचिन ने संपूर्ण संघासाठी वांग्याचे भरीत बनविले होते.


 


 


१०) सचिन एकवेव असा खेळाडू आहे ज्याने रणजी, दलीप व इराणी ट्रॉफी या सामन्यामध्ये सुरवातीलाच शतक पटकावले होते. आणि त्याचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाहीये.


 



१२) सचिनने पहिला First Class क्रिकेट सामना मुंबई करिता वयाच्या १४ व्या वर्षी खेळला तसेच सचिन ने पहिल्या टेस्ट सामन्यात सुनील गावस्कर यांनी भेट दिलेले पॅड घातले होते.


 



१३) सचिन वयाच्या २३ व्या वर्षी प्रथम भारतचे कप्तान बनले होते.


 



१४) सचिन ने लगातार १८५ एक दिवसीय सामने भारतासाठी खेळले जो एक रेकॉर्ड बनला आहे.


 



१५) सन १९९६ व २००३ मधील विश्वचषक क्रिकेट सामन्यात सचिन "Man Of Tournament" बनले होते.


 



१६) सचिनला घड्याळ व पर्फुम्स एकत्र करण्याचा छंद आहे तसेच जेव्हा सचिन bating करत असतात तेंव्हा त्यांची पत्नी अंजली ना काही अन्न खातात व पाणी देखील पीत नाही.


 



१७) १९९५ मध्ये सचिन वेश बदलून 'रोजा' चित्रपट बघायला गेले होते परंतु यांचा चष्मा पडल्याबरोबर चित्रपट गृहातील लोकांनी त्यांना ओळखले.


 



१८) सचिन ची बॅट साधारण १.५ किलोग्राम ची असायची. एवढी जड बॅट फक्त दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लूजनर वापरत होते.


 


 


१९) सचिन सौरभ गांगुली यांनी "बाबू मोशाय" बोलतात व गांगुली सचिन यांनी "छोटा बाबू" नावाने हाक मारतात.


 



२०) भारत सरकारकडून सचिन तेंडूलकर यांना पद्मविभूषण , राजीव गांधी अवार्ड (खेळ), महाराष्ट्र भूषण अवार्ड , पद्मश्री, अर्जुन अवार्ड आणि भारत रत्न या सर्व पदांनी सन्मानित केले आहे.


 


 


१०० शतक, १६३ अर्धशतक, ३४००० धावा हे बघून अस वाटत ना कि हे सगळे नंबर एखाद्या संघाचे आहेत. पण तस नाहीये, हे सगळे फक्त एकाच व्यक्तीने केलेले नंबर आहेत आणि ते कोणाचे आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये.. कारण ते तुम्हाला कळलच असेल.


★★★★★★★


आधुनिक
भारतीय क्रिकेट ला 
एका उंच शिखरावर
नेण्यात 
ज्यांचा सिंहाचा वाटा आहे.
भारतीय क्रिकेट वेड्या देशातील 
क्रिकेट रसिकांनी
ज्यांना
देवपण बहाल केले.
भारतरत्न
सचिन रमेश तेंडुलकर
म्हणजे
आपल्या सर्वाचा 
लाडका  
★★तेंडल्या★★
चा 
आज ४६ वर्षे पुर्ण करून
आज 
२४ एप्रिल २०२०
मा.सचिन रमेश तेंडुलकर
यांना
४७ व्या वाढदिवसाच्या
आपल्या सर्वाच्या
आणि 
पुणे प्रवाह परिवाराकडून
मनपुर्वक
शुभेच्छा....।।


★★★★★★