डॉक्टर्स,नर्स यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट निर्मितीसाठी पुण्यातील उद्योजक सरसावले॰

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोंनाचा प्रभाव वाढत असून या रूग्णांच्या सेवेत असणा-या डॉक्टर-नर्स-सेवक यांनाही कोरोंनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.यासाठी लागणार्‍या पीपीई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेट) किट्सच सर्वत्र तुटवडा जाणवत आहे.या अनुषंगाने या पीपीई किट्सची स्वामी बॅग्जने निर्मिती केली आहे.पुण्यातील व मुंबईतील अनेक रुग्णालये याचा वापर करीत आहेत.रुग्णालये,स्वयंसेवी संस्था,प्रशासन,खासगी रुग्णालये यांची मागणी वाढल्यास तितका पुरवठा करण्यास तयार आहेत.याचा वापर करून कोरोंना रुग्णाच्या सेवेत असणार्यांची सुरक्षा राखली जाईल असे स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप यांनी पत्रकात नमूद केले आहे.


छायाचित्र :पीपीई किट