पुणे प्रवाह न्युज पोर्टल
press note
*'अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी 'मध्ये ऑनलाईन क्लासरूम उपक्रमाला चांगला प्रतिसाद !*
------------------
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी' मध्ये ऑनलाईन क्लासरूम उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी दिली. कोरोना विषाणू साथीच्या आणि लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 'ऑनलाईन क्लासरूम' उपक्रम १८ मार्च पासून सुरु करण्यात आला आहे. या ऑनलाईन क्लासरूम उपक्रमात ओनलाईन लेक्चर्स,वेबिनार,क्विझ,व्हिडीओ,असाइनमेंट चा समावेश आहे. तसेच झूम ऍप आणि गुगल क्लासरूम वरून ट्युटोरिअल्सचा समावेश आहे. ई-टिचिंग साठी प्राध्यापक वर्ग मेहनत घेत आहे. विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घेतले जात आहेत,असेही प्रा.डॉ.किरण भिसे यांनी सांगितले.
................................................