पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धीकरिता,
१९/०४/२०२०,
लॉकडाऊन सह रुग्णानांचे सर्व स्तरावर प्रभावी नियोजन करा,
-मा,शेखर गायकवाड,
आयुक्त,पुणे महानगरपालिका,
सद्धयस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे,संख्यामक वाढ विचारात घेता पुढील नियोजन सर्व स्तरावर परिणामकारक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या,
माहे मार्च ते आजतागायत सर्व विभाग,अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केलेले आहे,त्याबाबत सर्व स्तरावरून दखलही घेण्यात आलेली आहे,
सद्धयस्थितीत वाढ होत असलेली संख्या विचारात घेता व आजवर सर्व विभाग,संबंधित अधिकारी यांनी केलेले नियोजन व पुढील काळात करावयाचे प्रभावी नियोजन याकरिता तातडीच्या बैठकीचे आयोजन मनपा मुख्य भवनातील नुतन सभागृहातील स्थायी समिती बैठकीच्या सभागृहात मा,शेखर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते,
याप्रसंगी विविध विभागाचे प्रमुख,झोनल वैद्यकीय अधिकारी,झोनल आयुक्त,खातेप्रमुख,मनपा सहाययक आयुक्त यांनी केलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला,तसेच पुढील काळात करावयाच्या नियोजनाच्या दृष्टीने सकारात्मक मार्गदर्शन करण्यात आले,
बैठकीस मा,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल,मा,अतिरिक्त मनपा आयुक्त शांतानु गोयल,आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे,सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे,डॉ,कल्पना बलिवंत,डॉ,संजीव वावरे,डॉ,वैशाली जाधव, अन्य विभागांचे डॉक्टर्स,व विविध विभागप्रमुख, झोनल आयुक,उपायुक्त, मनपा क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते,
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले कि, कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रनाकरिता आयसोलेशन पूर्व अर्थात प्री आयसोलेशन करिता १५,क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उपलब्ध मिळकती मध्ये पायाभूत सुविधांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे,प्री आयसोलेशनवर भर देताना रुग्ण व सोबत असलेल्या सर्व व्यक्तींच्या प्राथमिक तपासण्या करून सर्व नियोजन करण्यात यावे,अर्थात प्री आयसोलेशन,आयसोलेशन,
बाधित रुग्ण,अत्त्यवस्थ रुग्ण,मयत रुग्ण व्यवस्थापन, अशा महत्वपूर्ण मुद्द्यांवर करावयाचे नियोजन,औषधे,साधनसामुग्री,पीपीई किट्स,कक्ष व कक्षातील उपलब्धता, खाटा संख्या,याबाबत नियोजन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले,
याप्रसंगी अतिरीक्त मनपा आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल यांनी सांगितले की, मनपा रुग्णालये,व १५, क्षेत्रीय कार्यालयातून मूलभूत सुविधासह सर्व साधनसामुग्री योग्य प्रमाणात वितरित करणेत येत आहे,तथापि सद्धयस्थिती वाढ होत असलेली संख्या विचारात घेता संबंधित अधिकारी यांनी आवश्यक साधन सामुग्री,वैद्यकीय साहित्य,पीपीई किट्स,याबाबत वेळोवेळी मागणी यादी सादर करून उपलब्धता करून घ्यावी, असे सांगितले,
अतिरिक्त मनपा आयुक्त,( विशेष ) यांनी सांगितले की,सर्व ठिकाणच्या व्यवस्थेबाबत नियोजन योग्य चालू आहे,परंतु पुढील काळात करावयाचे नियोजन प्रभावी व संख्यत्मक दृष्ट्या वाढ करणे व त्यादृष्टीने अंमल करणे महत्वाचे आहे,प्रत्येक व्यवस्थेच्या मिळकती मध्ये तेथील उपलब्ध कक्ष,साहित्यांची उपलब्धता, मनुष्यबळ,विभागनिहाय विभाग प्रमुख नियुक्ती करणे,कामकाजाचे व त्या कामांशी संबंधित अधिकारी यांची संपर्क यंत्रणा,प्रत्येक मजल्यावर माहिती फलक,उपचार व संबंधित अधिकारी,मदतकार्य माहिती व प्रत्येक ठिकाणच्या नियोजनाची माहिती रुग्ण व नातेवाईकांना उपलब्ध होईल यानुसार व्यवस्थांपन तातडीने करण्यात यावे असे सांगितले,
- संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
१९/०४/२०२०,