पुणे प्रवाह न्युज पोर्टल
घरात बसून द्याल साथ तरच होईल कोरोना वर मात, पुणे : प्रतिनिधी - सुरक्षा कवच बनवू, कोरोनाला कायमचे पळवू. या उक्ती प्रमाणे कोरोना व्हायरस चे वाढते संक्रमण व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सम्पूर्ण जगात आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.मात्र अद्याप यावर औषध/लस उपलब्ध झाली नसल्याने त्याकामी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक पाहता कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण याबाबतची चिंता आता मोठेच नाही तर लहान बच्चे मंडळी देखील त्यांच्या घरच्यांना सतत हात साबणाने धुवा, मास्क लावा इत्यादी बाबत आठवण करून देत आहे. अशातच कु.वैष्णवी शिंदे इयत्ता 5 वी आणि कु.समर्थ शिंदे, इयत्ता 4 थी , सेंट पँट्रिक्स स्कूल, पुणे यांनी स्वाताला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून साकारलेले कोरोना च्या संक्रमणाबाबत घेण्याची आवश्यक पण महत्वाची काळजी त्यांच्या बोलक्या चित्रातून दाखविली आहे. वास्तविक पाहता सर्वानी आवर्जून याचे पालन करावे, याकरिता कु.वैष्णवी व कु.समर्थ या बालचमूने हा जनसंदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. वैष्णवी व समर्थ अँड.संतोष शिंदे, यांची मूल आहेत.अँड शिंदे हे गेल्या 22-23 वर्षापासुन अध्यक्ष-पुरूष हक्क संरक्षण समिती, पुणे, राष्ट्रीय सहसचिव-मेन्स राईट्स फाउंडेशन वेलफेअर सोसा, प्रदेश अध्यक्ष-इंटरनेशनल ऍडव्होकेट ऑर्गनायझेशन इंडिया, प्रदेश विधी अध्यक्ष-महाराष्ट्र मराठी सामाजिक सेवा संघ, प्रदेश उपाध्यक्ष- अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, प्रदेश सहसचिव-लौकाह्क्क समिती, सदस्य-अखिल भारतीय मजदूर सेवा संघ, दिल्ली. इत्यादी सामाजिक कार्य करीत आहेत.