मोबाईल क्लिनिक सुविधेचे उदघाटन  *अधिकाधिक लोकांपर्यंत सुविधा पुरवू - मोहन जोशी* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मोबाईल क्लिनिक सुविधेचे उदघाटन


 *अधिकाधिक लोकांपर्यंत सुविधा पुरवू - मोहन जोशी*


 सध्याच्या काळात विविध भागात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी मोबाईल क्लिनिक सुविधा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र आणि बीजेएस यांच्या वतीने सुरू करण्यात येत असून त्याचे उदघाटन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांच्या हस्ते आज(शुक्रवारी) सकाळी मंगळवार पेठ, कडबाकुट्टी येथे करण्यात आले.


रुग्णाला केसपेपर देऊन सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
 याप्रसंगी उपक्रमाचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी 
    महाराष्ट्र विद्यार्थी मंडळाचे सचिव डॉ.विकास आबनावे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सुरसे, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे च्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर, उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ.सुनील इंगळे, माजी अध्यक्ष डॉ.हिलरी रॉड्रिक्स, डॉ.आशुतोष जपे, डॉ.राजन संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात विजय वारभुवन, मनोज पिल्ले, सचिन वाघमारे, संकेत चव्हाण, शुभम कदम, आकाश वैरागे आदी कार्यकत्यांचा सहभाग आहे.