पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धीकरिता,
मा,महापौर,मा,आयुक्त यांच्या आवाहनाला विविध स्तरावरून मदतीचा ओघ,
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता मनपा विविध स्तरावर यशस्वी प्रयत्न करीत आहे,पुणेकरांनी उत्तम प्रकारे सहकार्य दिलेले आहे,
पुणे मनपाच्या वतीने देत असलेल्या लढ्यात सर्वजण आप आपल्या परीने सहभागी होत आहे,
अलीकडेच मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मनपा करिता वैद्यकीय व अनुषंगिक मदतीच्या सहकर्याकरिता आवाहन केले होते,
वरीलप्रमाणे आवाहनास अनुसरून आज मनपाच्या डॉ, नायडू सांसर्गिक रुग्णालयास पुण्यातील मिस्ट रेझोनन्स इंजिनियरिंग प्रा,लि, कंपनीच्या वतीने मनपाच्या डॉ, नायडू सांसर्गिक रुग्णालयास मिस्ट सॅनीटाईझर कक्ष उपलब्ध करून दिला,
या संदर्भात मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सदर कंपनीचे आभार व्यक्त करताना सांगितले की,कंपनीचे संचालक व उद्योजक मकरंद चितळे यांनी मनपाच्या आवाहनास प्रतिसाद देत डॉ,नायडू रुग्णालयातील वैद्यकीय सेवा उत्कृष्ट असून सद्धयस्थितीत नायडू रुग्णालयात येणारे रुग्ण,नातेवाईक,कर्मचारी वर्ग यांच्या दृष्टीने सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्वाचे आहे,अशा परिस्तिथीत प्रवेशासाठी जाताना व बाहेर पडताना निर्जंतुकीकरण अत्यंत महत्वाचे आहे,या परिस्तिथीस अनुसरून मकरंद चितळे यांनी आपल्या कंपनीचे निर्जंतुकीकरणाचे अर्थातच मिस्ट सॅनिटाईझर कक्ष डॉ, नायडू रुग्णालयात बसविण्याचे मान्य केले व आज तातडीने डॉ,नायडू रुग्णालयात प्रवेशद्वार येथे बसवून आज त्वरित कार्यान्वित केले,व डॉ, नायडू रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण,नातेवाईक,कर्मचारी यांच्या सुरक्षित निर्जंतुकीकरनाकरिता चांगला उपक्रम राबविला आहे,
सदर कक्षाचे आज महापालिका आयुक्त मा,शेखर गायकवाड यांनी आज उदघाटन केले,
या उपक्रमाबाबत मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले कि, सद्यस्थिती मध्ये डॉ,नायडू रुग्णालयात येणारे रुग्ण,नातेवाईक, व सर्व स्टाफ यांच्या सुरक्षा व निर्जंतुकीकरन या दृष्टीने हा उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले,
कंपनीचे उद्योजक व संचालक मकरंद चितळे यांनी सांगितले कि, डॉ,नायडू रुग्णालयातील सद्धयस्थिती बाबत विचार करता रुग्ण,नातेवाईक,व संपूर्ण स्टाफचा विचार करता सुरक्षित वातावरण व निर्जंतुकीकरण अत्यंत महत्वाचे असल्याने आम्ही या उपक्रमाद्वारे मनपाच्या लढ्यात सहभागी होणेकरिता मनपाच्या आवाहनास प्रतिसाद देउन मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांचेकडे या उपक्रमाची कल्पना मांडली,केवळ सामाजिक भावनेतून आम्ही हा कक्ष डॉ,नायडू रुग्णालयात उभारत आहोत असे सांगितले,
या कल्पनेस मा,महापौर यांनी त्वरित मान्यता दिली व आम्हास सेवेची संधी दिली असल्याचे आवर्जून सांगितले,
या मिस्ट सॅनिटाईझर कक्षातून प्रवेश करताना व रुग्णालयात प्रवेश करताना सोडियम हायपोक्लोराईत च्या मिश्रित द्रावणाने केवळ 10 सेकंदात सेन्सर च्या साहाय्याने व्यक्तीच्या सर्व अंगावर फवारले जाईल,तसेच रुग्णालयातून बाहेर पडतानाही अर्थात कक्षातून बाहेर येताना पुन्हा सेन्सर च्या स्वरूपातून फवारणी होईल,
त्यामुळे एकूणच सर्वांसाठीच हा कक्ष उपयुक्त ठरेल,
शहरातील गर्दीच्या ठिकाणी,।मॉल, थिएटर,बाजार पेठा,धार्मिक स्थळे,अशा ठिकाणी हा कक्ष परिणामकारक ठरेल असे त्यांनी सांगितले,
याप्रसंगी मा,अविनाश साळवे,मा,अतिरिक्त महापालिका आयुक्त,रुबल अगरवाल,सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ,संजीव वावरे,डॉ,सुधीर पाटसुटे, डॉ,रामचंद्र पोटे, डॉ,विवेकानंद जाधव,डॉ,पंडित सोनकांबळे,डॉ,अनिल तोडसाम,क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे,राजेश बनकर अन्य अधिकारी व मिस्ट रेझोनन्स इंजिनियरिंग प्रा,लि कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्तिथीत होते,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी
पुणे महापालिका,
3/4/2020,