राधा मीरा ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 

राधा मीरा ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


कर्जत दि.15  गणेश पवार

 

         कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यातील बहुतांश आदिवासी कुटुंब ही मजूरी करून उदर निर्वाह करतात. त्यांच्यावर लॉकडाऊन मुळे कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्र त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. या कुटुंबांची ही गरज लक्षात घेऊन राधा-मिरा चँरिटेबल ट्स्टचे अध्यक्ष भरत जगमोहन मेहरा यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू वाटप त्यांना करण्यात आले आहे. 

                     कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या लॉकडाउन व संचारबंदी मुळे आदिवासी व बाहेर गावहून आलेल्या मजूर कामगार ना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही संभाव्य उपासमार टाळली जावी मजूर, आदिवासी ची आबाळ होउ नये या साठी राधा-मिरा ट्स्टने विट कामगार,  जुम्मापटी,  दहिवली वाडी, झेंडेवाडी येथे गरजूना जीवनावश्यक वस्तूं वाटपास सुरुवात केली आहे. सरकारच्या वतीने रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना रेशनवर फक्त गहू व तांदूळ दिले जात आहेत. मात्र घरात जेवन बनविण्यासाठी तेल मसाला डाळी या अन्न घटकांची गरज असते ही बाब लक्षात घेऊन भरत जगमोहन मेहरा यांनी गोरगरीब आणि मजूर यांना एक महिना पुरेल एवढे धान्य किट तयार केले आहेत. त्या किट मध्ये तेल, डाळी, कादे, बटाटे, मसाला, साखर, मिठ आदि जीन्नसाचा समावेश करून एक कुटूबाला एक महिनाभर पुरेल एवढे धान्य प्रत्येक किट मध्ये  समाविष्ट आहे 

              कळंबवाडी पोशीर विट कामगार दहिवलीवाडी झेंडेवाडी जुम्मापटी एमएमआरडीचे कामगार जवळपास 600 कुटूबाना धान्य वाटप केले असून गरीब आणि मजूर हे अन्नधान्य विन कोणत्याही व्यक्ती ची आबाळ होऊ नये एवढंच आपला उद्देश आहे असे मत राध मिरा चँरिटेबल ट्स्ट चे अध्यक्ष भरत जगमोहन मेहरा यांनी व्यक्त केले. यावेळी कायदेशीर सल्लागार अँड महेश गोविंद आगे, व्यवस्थापक रजेश पिल्लई, मनोज पारधी, विश्वास विरले, भुषण विरले आदी उपस्थित होते.