पुणे प्रवाह न्युज पोर्टल
व्हिस्टाप्रिंटद्वारे कोव्हिड-१९ टेम्पलेट्स व फेसमास्कचे अनावरण
~ साथीच्या रोगाबद्दल जागृती करण्याचा उद्देश ~
मुंबई, २१ एप्रिल २०२०: कोव्हिड-१९ बद्दल लोकांना माहिती व शिक्षण देण्याकरिता व्हिस्टाप्रिंटने या आजारविषयक टेम्प्लेट्स त्यांच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सादर केल्या आहेत. या टेम्प्लेट्सवर आरोग्य व सुरक्षाविषयक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी या टेम्प्लेट्स बॅनर्स, पोस्टर्स, प्लास्टिक साइन्स अशा उत्पादनांमध्ये उपलब्ध आहेत. अधिक वैयक्तिक संपर्कासाठी पोस्टिंग कार्ड्स, फ्लायर्स आणि व्हिजिटिंग कार्डवरही ही माहिती असेल, जेणेकरून ही माहिती मनावर कोरली जाईल. सर्कल स्टिकर्स, प्रॉडक्ट लेबल्स इत्यादी उत्पादनेदेखील फूड डिलिव्हरी कंपन्यांना व किराणा दुकानांना वापरता येतील. या जगजागृती मोहिमेला आणखी बळ देण्यासाठी स्टाप्रिंटने प्रिंटेड फेस मास्कदेेखील लाँच केले आहेत.
ही उत्पादने वैयक्तिकरित्या तसेच कंपन्यांनाही त्यांच्या परिघातील लोकांना तसेच ग्राहक, कर्मचाऱ्यांना या आजाराबद्दल माहिती देण्याकरीता वापरता येतील. यूझर्सना त्यांचा संदेश सानुकुलित करण्यासाठीही सुविधा पुरवली जाते. वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या विशेष क्युरेटेड पेजवरून या संसर्गाशी संबंधित सर्व डिझाइन्स घेता येतील.
व्हिस्टाप्रिंट इंडियाचे सीईओ श्री भरत शास्त्री म्हणाले, ‘‘कोव्हिड-१९ विरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी प्रभावी आणि स्थिर संवाद महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे लोकांसाठठी किंवा उद्योगांसाठी सानुकुलित उत्पादने देताना आम्हाला आनंद होत आहे. कोव्हिडविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी ही उत्पादने महत्त्वाची ठरतील.