औद्योगिक आस्थापनांमधील कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा  कुठलाही निर्णय नाही- जिल्हाधिकारी राम

पुणे  प्रवाह न्युज पोर्टल


 


औद्योगिक आस्थापनांमधील कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास
मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा  कुठलाही निर्णय नाही- जिल्हाधिकारी राम
पुणे, दि.23-  कारखान्यामधील किंवा औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
          कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे  मेसेज 
सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फॉरवर्ड केले जात आहेत. असे फॉरवर्ड केले जाणारे मेसेजेस चुकीचे आहेत. हे मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नये तसेच या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
  कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.