कोरोना सर्वे चे कर्तव्य पार पाडणाऱ्या शिक्षकांना फेस शिल्ड प्रदान* ...... संदीप खर्डेकर* अध्यक्ष क्रिएटिव्ह फौंडेशन.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोना सर्वे चे कर्तव्य पार पाडणाऱ्या शिक्षकांना फेस शिल्ड प्रदान*


पुणे मनपा च्या वतीने घरोघरी सर्वे चे काम सुरु आहे.मनपा चे शिक्षक हे काम करत असून घरोघरी कोणी आजारी आहे का किंवा कोरोना ची लक्षणे आहेत का किंवा कसे असे  जोखमीचे काम करत आपले कर्तव्य बजावत आहेत.
या शिक्षकांना अधिक सुरक्षितता लाभावी यासाठी आज कीट्रॉनिक्स आणि क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने  फेस शिल्ड प्रदान करण्यात आले.वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वे चे काम करणाऱ्या ८० शिक्षकां साठी डॉ.अरुणा तरडे यांच्या कडे हे फेस शिल्ड सुपूर्द करण्यात आले.यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,कीट्रॉनिक्स च्या दीपा कुलकर्णी आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर  उपस्थित होते.
आपला,
*संदीप खर्डेकर*
अध्यक्ष क्रिएटिव्ह फौंडेशन.