महाराष्ट्र सरकारच्या आदेशाप्रमाणे केशरी शिधापत्रिकाधारकांना त्वरित मे आणि जून महिन्याचे धान्य माफक दरात भेटावे-- संजय भिमाले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्र सरकारच्या आदेशाप्रमाणे केशरी शिधापत्रिकाधारकांना त्वरित मे आणि जून महिन्याचे धान्य माफक दरात भेटावे-- संजय भिमाले

        महाराष्ट्र सरकारच्या आदेशाप्रमाणे केशरी शिधापत्रिकाधारकांना त्वरित मे आणि जून महिन्याचे धान्य माफक दरात भेटावे अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजय जी भिमाले यांच्यावतीने पुणे जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी यांना करण्यात आली आहे तसेच मंगळवार पेठेतील 400 केशरी शिधापत्रिका धारकांचे रेशनिंग कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स देखील जमा करण्यात आले.

         संचार बंदीमुळे अनेक गरीब गरजूंना अद्यापि पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.महाराष्ट्र सरकारने मे आणि जून या दोन महिन्यांसाठी केसरी शिधापत्रिकाधारकांना माफक दरात धान्य देण्याचा आदेश काढला आहे परंतु हे धान्य अदयापि रेशन दुकानदार पर्यंत पोहोचलेच नसल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एपीएल (केशरी शीधापत्रिका) धारकांना मे आणि जून या दोन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय होऊन दहा दिवस उलटून गेले तरी केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध झालेले नाही रेशन दुकानदाराकडे याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित शिधापत्रिकाधारकांचे धान्य शासनाकडून उपलब्ध झाले नाही त्यामुळे एक मे नंतर हे धान्य वितरित केले जाईल असे सांगितले जाते. तसेच केशरी रेशनिंग कार्ड व अन्नधान्याचा शिक्का नसल्याने धान्य मिळणार नसल्याचे कारण रेशन दुकानदार करीत आहेत परंतु महाराष्ट्र सरकारने अन्नधान्याचा शिक्का नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी हे योजना असल्याचे जाहीर केले आहे असे असले तरी रेशन दुकानदार धान्य देण्यास खोटी कारणे सांगून शिधापत्रिकाधारकांची दिशाभूल करीत आहेत अशी तक्रार संजयजी भिमाले यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांना केली आहे. संघटनेच्यावतीने मंगळवार पेठ भागातील असे केशरी शिधापत्रिकाधारक धाण्यापासून वंचित असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी क्षीरसागर साहेब यांना फोन वर कळविण्यात आले. यावर त्यांनी संघटनेस संबंधित दुकानदारांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.तसेच मंगळवार पेठेतील गरजू नागरिकांचे ऑनलाइन नोंदी,रेशनिंग कार्ड वर शिक्का व इतर समस्या सोडविण्याकरिता नागरिकांचे रेशनिंग कार्ड, आधार कार्ड यांची झेरॉक्स कॉपी संबंधित कार्यालयास दिल्यास कारवाई करता येईल अशा सूचना अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिल्याने दिनांक 16/ 4 /2020 रोजी मंगळवार पेठ येथील 400 नागरिकांची यादी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आली. अशी माहिती संजय जी भिमाले यांनी दिली आहे