पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मा. संपादक,
राज्या मध्ये लॉकडाउन मुळे शेती व शेतकर्यां समोर निर्माण झालेल्या समस्यातुन मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटनेने काही उपाय सुचविले आहे. सदर निवेदनातील विषयांना आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावे ही विनंती.
अनिल घनवट.
प्रति,
मा.मुख्यमंत्री,
महाराष्ट्र शासन, मंत्रालय,
मुंबई ३२.
विषय :- लॉकडाउन मधील शेतकर्यांच्या प्रश्ननां बाबत.
महाशय,
देशावर वर, राज्यावर कोरोना साथीचे मोठे संकट आलेले आहे. आपण या संकटाला अतिशय सावधगिरिने व धीराने सामोरे जात आहात. आपली कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. या संकटात शेतकरी स संघटना आपल्या बरोबर आहे व प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे.
लॉक डाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. सर्व उद्योग धंदे बंद आहेत पण शेती मात्र चालू आहे. जनतेला खाण्या पुरते पिकत पण लॉक डाऊमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदर निवेदना द्वारे शेतकर्यांच्या काही प्रमुख समस्या आपल्या समोर ठेवत आहे.
१) राज्यभर शेतात भाजीपाला, धान्य, कडधान्य विक्रीसाठी तयार आहे परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यसाठी प्रमुख कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे शेतातला माल शहरात येणार नाही व शहरांमध्ये, भाजीपाल्याची प्रचंड टंचाई निर्माण होऊ शकते. भाज्यांचे दर ही गगनाला भिडू शकतात.
या वर उपाय म्हणुन शेतकरी संघटनेने 'आमच्या गावात रास्त भावात' हे अभियान सुरु केले आहे. शेतकरी रास्त भावात भाजिपाला शहरात पुरवण्यास तयार आहे. ते करण्यासाठी शेतकर्यांना किंवा शहरात विकणार्यांना तातडीने वाहन व व्यक्ती निहाय पास/ परवाने देण्याची व्यवस्था करण्यात यावी. पोलिसांनी शेतीमाल वाहतुक करणार्या किंवा विकुन मोकळा परत जणार्यांना त्रास न देण्याबाबत सुचना देण्यात याव्यात.
२) विदर्भ मराठवाड्यात शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात कापुस शिल्लक आहे. कोरोनामुळे सी. सी. आय मार्फत होणारी शासकीय खरेदी बंद झाली आहे. शेतकर्यांच्या घरात कापुस साठवलेला आहे व उन्हाळ्याच्या कडक उन्हात काही दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते तसेच शेतकर्यांना पैशाची गरज आहे. पुढे पेरणीचा हंगाम आहे त्यासाठी सि. सी. आयची कापुस खरेदी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे.
३) कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील सर्व मोठे उद्योग बांद आहेत, कार्यालये, दुकाने बंद आहेत. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर कमी झाला आहे. दिवसा शहरांना व उद्योगांना पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतीला रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. सध्या लॉक डाउनमुळे शहरातील कार्यालये, दुकाने व मोठे उद्योग बंद असल्यामुळे बरीच वीज शिल्लक रहात आहे. उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज जास्त असते व शेतकर्यांनी रात्री अपरात्री, जिव धोक्यात घालुन पिकांना पाणी द्यावे लागते. सध्या शिल्लक असलेली वीज कृषिसाठी दिवसा उपलब्ध करुन दिल्यास शेतकर्यांना सुखकर होइल.
महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांच्यावतीने सदरचे निवेदन आपणास सादर करीत आहे. वरील मागण्यांचा गांभिर्याने विचार करुन ग्राहकांच्या, शेतकर्यांच्या व राज्याच्या हितासाठी मागण्या मान्य करुन तातडीने अंमलबजावणी व्हावी ही विनंती.
दि.१४/०४/२०२०
आपला विश्वासू
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.
प्रत :
१) मा. उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र शासन, मंत्रालय.
२)मा. कृषि मंत्री
महाराष्ट्र शासन, मंत्रालय.
३) मा. पणन मंत्री
महाराष्ट्र शासन, मंत्रालय.
४) मा. उर्जामंत्री
महाराष्ट्र शासन, मंत्रालय.
५) मा. गृह मंत्री
महाराष्ट्र शासन, मंत्रालय.