घराघरातील प्रत्येक* *व्यक्ती व* *सोसायटीला  नम्र* आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


(★ *ज्ञान विज्ञान* *प्रतिष्ठान द्वारा*               *


घराघरातील प्रत्येक* *व्यक्ती व* *सोसायटीला  नम्र* *आवाहन* ★)
★ सध्या घराघरातील टेलिव्हिजन व मोबाईल मधील सोशल मीडिया द्वारा फक्त कोरोनोचाच विषय व सततची चर्चा आहे. यामुळे, प्रत्येक मिनिटाला समाजात, राज्यात व देशातही नकारात्मक बाबींचा अतिशय वेगाचा फैलाव आपण सर्वजण मिळून कळत नकळत करतो आहोत.त्यामुळे सर्वत्र विनाकारण भिती,चिंता व तणावाचे वातावरण ,  तसेच,नकारार्थी व उदास वातावरण निर्माण होत आहे.यासाठी आपण आपली स्वतः ची एक आचार संहिता स्वतः लागू करून घ्यावी, आणि आपल्या मध्ये ,आपल्या घरामध्ये व समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवावी,ही विनंती व आवाहन! यासाठी आपण १) टेलिव्हिजन वरील बातम्या पाहणे बंद करावे,त्याऐवजी,इतर शेकडो पर्याय असलेले करमणुकीचे कार्यक्रम पहावेत.२) तरीसुद्धा, माहितीसाठी , दिवसभरात एखाद्या वेळी जरी बातम्या पाहिल्या,तरी त्याबद्दल घरात , शेजारी किंवा कार्यालयात बोलून, /सांगून प्रचार करू नये . ३) कोरो ना  व्ह्यायरस बद्दलची कोणतीही  नकारात्मक माहिती फेस बुक , व्हॉट्स ऍप, इंस्टा  किंवा तत्सम अन्य मीडियातून फॉरवर्ड करू नये.याऐवजी,इतर अनेक चांगले  विषय ,चांगले विचार, चांगले साहित्य जरूर फॉरवर्ड / शेअर करावे, आणि मोबाईल प्रमाणे  स्वतः च्या व समाजाच्या मन बुद्धी ची बॅटरी कायम पॉवर फुल व चार्ज   ठेवावी आणि याद्वारे, सकारात्मक ऊर्जा कायम ठेवावी,असे आवाहन आम्ही सामाजिक बांधिलकीतून करीत आहोत.               आपले,                       ★ *ज्ञान विज्ञान प्रतिष्ठान* व *जाणीव* *जागर परिवार,पुणे*    (टीप: यासाठी आम्ही ब्रम्हा कुमारी  राज योगिनी डॉ.शिवानी दीदी यांची याविषयीची छोटी मुलाखत व  विवेक म्हेत्रे यांनी " यश विवेक " द्वारा सांगितलेला सोपा उपाय यू ट्यूब वर  जरूर पहावा, आवश्यकता वाटल्यास अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९८२२८९५०१७ वर जरूर मेसेज टाकून संपर्क  करावा,  असे आवाहन प्रतिष्ठान करीत आहे.