ट्रम्प तात्यांच्या धमकी समोर मोदी सरांची  शरणागती*?????

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*ट्रम्प तात्यांच्या धमकी समोर मोदी सरांची  शरणागती*?????


*वाँशिंग्टन/नवी दिल्ली :-* हायड्राँक्सीक्लोरोक्विन  हे प्रामुख्याने मलेरियासाठी वापरले जाणारे प्रतिरोधक औषध आहे.जागतिक पातळीवर भारत हा या औषधांचा सर्वात मोठा उत्पादक व निर्यातदार आहे.कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलेले  असताना,भारताने इतर औषधा सोबतच ,या औषधाच्याही निर्यातीवर बंदी घातली आहे.
"कोविड - १९ म्हणजे कोरोना" च्या रुग्णावर ही  हे औषध  परिणामकारक ठरते ,असा दावा केला जातो.परंतु   तसा ठोस वैज्ञानिक आधार अद्यापही
सापडलेला नाही .
अमेरिकेत कोरोनाची साथ हाताबाहेर जात असल्याने,ट्रम्प तात्यांनी या आजारावरही "हायड्राँक्सीक्लोरोक्विन" रामबाण इलाज ठरु शकतो.असा ठाम समज केल्याने,आपल्या देशातील रुग्णांसाठी वापरण्याचा चंग बांधला आहे. ट्रम्प तात्यांच्या आग्रहाखातर अमेरिकेच्या अन्न व औषध  प्रशासनाने कोरोना साठी ,त्यांचा वापर करण्याची संमती दिली आहे.परंतु "हायड्राँक्सीक्लोरोक्विन" सोबत इतर औषधाचा अमेरिकेत तुटवडा आहे.
या पाश्र्वभूमीवर प्रधानमंत्री मोदींना ट्रम्प तात्यांनी फोन करून "हायड्राँक्सीक्लोरोक्विन" औषध अमेरिकेला पुरविण्याची धमकी अधिक विंनती केली आहे.
ट्रम्प तात्यांच्या धमकी अधिक विंनती समोर आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी सरांनी गुडघे टेकले आहे.असेच म्हणावे लागेल.
मानवतावादी दुष्टिकोन समोर ठेवून अमेरिकेला भारताने  मदतीचा हात पुढे करावा.परंतु भविष्यात आपल्या देशातील नागरिकांना "हायड्राँक्सीक्लोरोक्विन" ची आवश्यकता भासल्यास, उपचारा अभावी मरण्याची वेळ येऊ नये एवढीच माफक ईच्छा सर्व देशवासीयांची ट्रम्प तात्या आणि प्रधानमंत्री मोदी सरांच्या मैत्री मध्ये वाटते ??????
क्रमशः.............