पुणे प्रवाह न्युज पोर्टल
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
द युनिक अकॅडमीकडून ऑनलाइन अध्यापन

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणी येत आहेत. प्रत्यक्षात अध्ययन व अध्यापन आणि इतरही अनेक उपक्रमांत खंड पडल्याने विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास कमी होत आहे. अशा स्थितीत आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी व अॅकॅडमी आणि सर्व मार्गदर्शक प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत आहेत, हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा, या हेतूने अकॅडमीकडून अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत 'ई-लर्निंग'च्या साहाय्याने आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन अध्यापन केले जात आहे, अशी माहिती संचालक मल्हार पाटील यांनी दिली.
'इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युयल क्लासरूम'द्वारे एकाच वेळी पाचशेहून अधिक विद्यार्थी अध्यपनाचा लाभ घेऊ शकतात. रेग्युलर क्लासरूमप्रमाणे या प्रक्रियेतही विद्यार्थी आपले प्रश्न व शंका थेट प्राध्यपकांना विचारू शकतात. याप्रमाणे प्रथमच 'इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म' उपलब्ध करून दिला आहे. याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थी घरबसल्या मोठ्या संख्येने घेत आहेत. अॅकॅडमीने राबविलेल्या ऑनलाइन अध्यापनाच्या आधुनिक यंत्रणेला विद्यार्थ्यांनी उत्साही प्रतिसाद देऊन आपली पसंतीही दर्शवली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या कोर्स को-ऑर्डिनेटर यांच्याबरोबर संपर्क साधावा, याबाबत विद्यार्थ्यांना पासवर्ड देऊन सहभागाबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे पाटील म्हणाले.
'द युनिक अॅकॅडमी'च्या वतीने सर्व ई-लर्निंग कोर्सेस आपल्या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन सराव चाचणी (टेस्ट सिरीज) व स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ व उपयुक्त असणारे म्हणून बुलेटिन मासिकदेखील पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. शिवाय सर्व तज्ज्ञांच्या विषयांनुसार मार्गदर्शनाच्या ध्वनिचित्रफितींची लिंक व विविध परीक्षांचे यशस्वी विद्यार्थी आणि प्रसिद्ध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी ध्वनिचित्रफितींची लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. युनिकच्या राज्यभरातील सर्व शाखेचे प्राध्यापक सर्व विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून अभ्यास व मार्गदर्शन याबाबत त्यांच्यात सातत्याने देवाणघेवाण सुरू असल्याचे पाटील यांनी नमूद केले.