भारती विद्यापीठ आयएमईडी च्या २३९ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press note                                                                                                                           *भारती विद्यापीठ आयएमईडी च्या २३९ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट*


पुणे:


भारती अभिमत विदयापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) च्या २३९ विद्यार्थ्यांना भारतातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये विविध पदांवर प्लेसमेंटस मिळाल्या आहेत.


भारती विद्यापीठ आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कार्पोरेट रिसोर्स सेल या स्वतंत्र विभागामार्फत प्लेसमेंटससाठी आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह सारख्या उपक्रमाला १५० हुन अधिक कंपन्यांनी प्रतिसाद दिला. टेक महिंद्रा,विप्रो,आदित्य बिर्ला,टाटा अशा नामवंत कंपन्यांचा त्यात समावेश आहे.उदयोगक्षेत्राकडून विद्यार्थ्यांबद्दल असणाऱ्या अपेक्षा,कुशल मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत वेगवेगळे मार्गदर्शन घेतले जाते.


संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.दिपक नवलगुंद,डॉ.श्याम शुक्ला यांनी प्लेसमेंट सेलचे काम पाहिले. विशेष प्रशिक्षण,व्यवसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण,समुपदेशन असे उपक्रम आयोजित करण्यात आले.स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम मधून मधून ६ विदयार्थी अजेटिना,लिथुवानिया व २ विद्यार्थी युगांडा येथे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत गेले आहेत.


कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे,कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे ही मजल मारणे शक्य झाले,असे डॉ.सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.
------------------------------


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image