पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट *एम.सी.ई. सोसायटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सकाळी अभिवादन* -------------- कोरोना लॉकडाऊन पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचा निर्णय
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. मात्र, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य १४ एप्रील रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील.सोशल डिस्टंन्सिंग चे नियम पाळून सकाळी ९ वाजता संस्थेच्या असेम्ब्ली हॉल मध्ये अभिवादन करण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, संस्थेचे सचिव डॉ.लतिफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मिरवणुकीचे हे १६ वे वर्ष असणार होते.
दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. दहा हजार विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात
------------------------------