डॉ अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक :लोकजनशक्ती पार्टीचा आरोप* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
*डॉ अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक :लोकजनशक्ती पार्टीचा आरोप*


पुणे :


ससून हॉस्पिटल चा कायापालट करण्यात आणि रुग्णसेवाना प्रभावी मानवी चेहरा देण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या डॉ अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट ,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 


ससून हॉस्पिटल हे गोरगरिबांवर उपचार करणारे हॉस्पिटल आहे. तेथे आधुनिक उपचार साधने उपलब्ध करणे ,निधी उपलब्ध करणे,आणि डॉक्टर -कर्मचाऱ्यांची सशक्त टीम उभारण्याचे काम डॉ अजय चंदनवाले यांनी केले. राजकीय कारणांकरिता त्यांचा ससून हॉस्पिटल चा पदभार काढून घेण्यास आमचा विरोध आहे,असे संजय आल्हाट यांनी या पत्रकात म्हटले आहे. 


कोरोनाच्या काळात गोरगरीब जनतेला ससून हॉस्पिटल मध्ये मिळणारी सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी डॉ चंदनवाले यांना पुन्हा सन्मानाने जबाबदारी द्यावी ,असेही या पत्रकात म्हटले आहे.                          --------------------------------                                                                                                    


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली