पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम


मुंबई, १७ एप्रिल २०२०: गेल्या काही काळात सोन्याचा भाव वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्ड फ्यूचर $1460/oz च्या (१६ मार्च २०२० रोजी ) निर्देशांकावरून $1750/oz (१६ एप्रिल २०२० रोजी) च्या आसपास पोहोचला. ही जवळपास २० टक्क्यांची वृद्धी आहे. एमसीएक्सवर १६ मार्च २०२० रोजी गोल्ड फ्यूचर 38400/10 ग्रामच्या खालील पातळीवर होते. १६ एप्रिल रोजी ते वाढून ४७,००० अंकांच्या पुढे गेले. यात सुमारे २२ टक्क्यांची वृद्धी दिसून आली.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की पिवळ्या धातूतील वृद्धी म्हणजे गुंतवणूकदारांना जगात होणा-या प्रत्येक धातूच्या तुकड्याची महत्वाकांक्षा असते, याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र भौतिक रुपात ते असे करू शकत नाही. पण फ्यूचर ट्रेंडिंग/ इन्व्हेस्टमेंटद्वारे ते ही क्रिया करतात. अनिश्चिततेच्या वेळी सुरक्षित मार्गाची निवड करावी लागल्याने गुंतवणूकदार हैराण आहेत. सुरक्षित झेप आणि गुंतवणुकीच्या शोधात तो पिवळ्या धातूकडे पहात आहेत.


केंद्रीय बँकांनी समोर यावे:


जागतिक स्तरावर केंद्रीय बँकांनी जगभरातील घसरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थांना आधार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अमेरिकी फेडरल रिझर्व्हदेखील इमर्जन्सी लँडिंग प्रोग्रामचा विस्तार २.३ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत करू शकते. फेडने फेड फंडचा दर १.५% ते शून्य-०.२५%च्या मर्यादेपर्यंत कमी केले आहेत. ट्रेझरी बाँड आणि मार्टगेज बॅक सिक्युरिटीच्या अमर्याद खरेदीची घोषणा केली आहे. तसेच लँडिंग फॅसिलिटीसाठी एकूण २.३ अमेरिकी बिलियन डॉलरची घोषणा केली. यात ४५४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या रिस्क कॅपिटलचा फायदा घेतला जाईल. (जो गरज पडल्यास नुकसान भरपाई करेल, हे अमेरिकी सरकारने दिले आहे.)


युरोपीय सेंट्रल बँकेने वर्षभराच्या अखेरपर्यंत एकूण €870 बिलियनची मदत दिली आहे. ग्रीस आणि इटलीसारख्या देशांची यातून मदत होऊ शकते तसेच कमी भांडवलाच्या बँक फंडिंड प्रोग्रामचा विस्तारही यातून केला जाऊ शकतो.


बँक ऑफ इंग्लंडने ०य६५% पासून ०.१% ची घसरण घेतली असून ज्यादा बँक फंडिंगसह एक नवा £200 बिलियन बाँड खरेदी करण्याचा उपक्रमही सुरू केला. साधारणत: केंद्रीय बँक व्याजदरात बदल करून चलन धोरण लागू करते. मात्र व्याज दर आधीच शून्य आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी केंद्रीय बँक अर्थव्यवस्थेत पैशांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.


पुढे काय होईल?


जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या वाढती संख्या भयंकर स्थितीचे दर्शन घडवते. या महामारीचा एकमेव उपाय म्हणजे लस शोधून काढणे, उपचार करणे. आणि ही अत्यंत कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. हा आजार नियंत्रित केला नाही तर जगातील प्रत्येक भागाला त्रास देण्यासाठी दुस-या, तिस-या आणि चौथ्या टप्प्यात पुन्हा डोके वर काढेल. ज्या प्रकारे फेडरल रिझर्व्ह आणि इतर प्रमुख केंद्रीय बँकांनी आधीच अकल्पनीय पद्धतींनी आपल्या बॅलेन्स शीटचा विस्तार केला आहे, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय समूहाला या आठवड्यात काही निर्णय घेण्याची गरज आहे. पूर्व युरोपीय सेंट्रल बँकेचे अध्यक्ष मारियो ड्रॅगी यांचे प्रसिद्ध शब्द आहेत- ‘जागतिक वित्तीय प्रणाली टिकवून ठेवण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते केले पाहिजे’.


अशा प्रकारच्या अनिश्चित काळात गुंतवणूक पिवळ्या धातूकडेच कलणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती $१८५०/ औंसपर्यंत वाढू शकतात. तर एमसीएक्स फ्यूचर्समध्ये सोन्याच्या किंमती ५० हजार रुपये/१० ग्रामच्या निर्देशांकाकडे वाढू शकतात. बाजार लवकरच ही उंची गाठेल, अशी अपेक्षा आहे.