*एम.सी.ई. सोसायटी ची  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन मिरवणूक रद्द*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*एम.सी.ई. सोसायटी ची  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन मिरवणूक रद्द*
--------------
कोरोना लॉक डाऊन पार्श्व भूमीवर निर्णय 


पुणे : 


‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक कोरोना साथीच्या पार्श्व भूमीवर रद्द करण्यात आली आहे. मात्र, संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य १४ एप्रील रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.


 


 ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मिरवणुकीचे हे १६ वे वर्ष होते.



दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. दहा हजार विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात


------------------------------