पुणे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनाप्पा पहिलवान (वय ४४ वर्षे)यांचे  ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


दुखःद निधन बातमी


पुणे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनाप्पा पहिलवान (वय ४४ वर्षे)यांचे  ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.
   पुणे लष्कर भागातील बुट्टी स्ट्रीट येथील शिवतेज मित्र मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते तसेच पुणे लष्कर वीरशैव लिंगायत गवळी समाजाचेही ते सक्रिय सदस्य होते. शिवतेज मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबीरं, आरोग्य तपासणी शिबीरं, विशेष मुलांसाठी अन्नदान, सफाई कर्मचारी सत्कार , विविध खेळाडूंचे सत्कार आदी उपक्रम राबविले असून त्यांनी स्वतःही अनेक वेळा रक्तदान केले होते.मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव, ख्रिसमस, दहीहंडी आदी उत्सव साजरे करण्यात त्यांचा पुढाकार होता.
    अत्यंत मनमिळावू व सामाजिक भान असलेले मनोज पहिलवान यांच्या निधनामुळे लष्कर भागातील विविध सामाजिक संघटना व मंडळांनी दुख व्यक्त केले आहे.


सोबत- फोटो व  म्रुत्यु दाखला जोडला आहे.