अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुका शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना लॉक डाऊन मध्ये असलेल्या सुरक्षारक्षक,बांधकाम मजूर,रिक्षाचालक, मोलकरीन,  रोजंदारीवरील कामगार यांना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुका शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले.

        कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण भारतातच वाढत आहे त्यातच पुणे शहर रेड झोनमध्ये असल्याने येथील जनता गेले दीड महिना लॉकडाऊन मध्ये आहे, या लॉकडाऊनमध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, बांधकाम मजूर,  रिक्षाचालक,मोलकरिन,  रोजंदारीवरील कामगार यांचे हाल होत आहे. याची जाण ठेवून रामटेकडीजवळील  म्हाडा वसाहत ,  बिराजदार वस्ती, बी. टी. कवडे रोड, सुरक्षा नगर,हिंगणे मळा येथील वरील सर्व कामगारांना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुका  शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये पाच किलो तांदूळ,  पाच किलो गहू,दोन किलो साखर,  दोन किलो तूर डाळ,दोन लिटर खाद्यतेल,एक किलो चहा पावडर,  चार डेटॉल साबण इत्यादी वस्तू देण्यात आले

     याकरिता अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा साळवे,  महिला आघाडी शहराध्यक्ष शीला उपत्ती,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिभाऊ तावरे,हमीदा शेख,  शशिकांत देशपांडे,बिभीषण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान