भारतीय जैन संघटना आणि युनानी मेडिकल कॉलेज कडून                                                            वैद्यकीय मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे पथक* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
*भारतीय जैन संघटना आणि युनानी मेडिकल कॉलेज कडून                                                            वैद्यकीय मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे पथक*
पुणे :
कोरोना लॉक डाऊन काळात पुण्यातीलगरजुंना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि आझम कॅम्पस मधील झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजकडून मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
 या वैद्यकीय पथकात २५ डॉक्टर्स आणि ५ सुसज्ज रुग्णवाहिका आहेत. १५ एप्रिल पासून या पथकाने कामास सुरुवात केली आहे.आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे असलेल्या युनानी महाविद्यालयात या पथकाला कामाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी डॉ.पी.ए.इनामदार,अबेदा इनामदार, डॉ.मुश्ताक मुकादम,डॉ.नाझीम शेख,प्राचार्य जलिस शॆख उपस्थित होते.या पथकाचे नेतृत्व डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याकडे आहे. युनानी महाविद्यालयाच्या आणखी आजी,माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यानी या कोरोना विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले आहे.शासकीय यंत्रणेशी समन्वय करून हे पथक सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा,तपासण्या,उपचारांसाठी कार्यरत राहणार आहे,असे त्यांनी सांगितले.
१५ आणि १६ एप्रिल रोजी येरवडा,भीमनगर,कोंढवा,शिवनेरीनगर  या भागात या पथकाने वैद्यकीय सेवा दिली.शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जैन संघटना आणि झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याशी 9922404536 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------                                                                                                                


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image