खाजगी लँबमधून येणाऱ्या कोरोना टेस्टच्या अहवालात घोळ __________________________________ खाजगी लँबमधून येणाऱ्या कोरोना टेस्टच्या अहवालात घोळ समोर आला आहे. यामुळे शासनानं मेट्रोपोलिस या खाजगी लँबला नोटीस पाठवली आहे. चुकीचे अहवाल दिल्यानं खाजगी लँबची टेस्ट करण्याची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. मेट्रोपॉलिस या खाजगी लँबच्या अहवालांमध्ये अनियमीतता आढळल्यानं शासनानं लँबला नोटीस दिली आहे. अपुरे टेस्ट किट आणि अहवालांमध्ये अनियमीतता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी सरकारी लँबसह ८ खाजगी लँबला परवानगी दिली होती. असे असले तरीही खाजगी लँब कडून आलेले रिपोर्ट पुन्हा तपासले जातात. शासनाकडून केलेल्या पुर्नतपासणीत खाजगी लँबच्या अहवालात काही तफावत आढळून आली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर निगेटिव्ह रुग्णांचे अहवाल नंतर पॉझिटीव्ह आढळले. मेट्रोपोलिस या लँबच्या टेस्टमध्ये हा गोंधळ दिसून आला. त्यामुळे त्यांचे काम तूर्तास थांबवले आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


खाजगी लँबमधून येणाऱ्या कोरोना टेस्टच्या अहवालात घोळ
__________________________________


खाजगी लँबमधून येणाऱ्या कोरोना टेस्टच्या अहवालात घोळ समोर आला आहे. यामुळे शासनानं मेट्रोपोलिस या खाजगी लँबला नोटीस पाठवली आहे. चुकीचे अहवाल दिल्यानं खाजगी लँबची टेस्ट करण्याची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. 


मेट्रोपॉलिस या खाजगी लँबच्या अहवालांमध्ये अनियमीतता आढळल्यानं शासनानं लँबला नोटीस दिली आहे. अपुरे टेस्ट किट आणि अहवालांमध्ये अनियमीतता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 


कोरोनाची टेस्ट करण्यासाठी सरकारी लँबसह ८ खाजगी लँबला परवानगी दिली होती. असे असले तरीही खाजगी लँब कडून आलेले रिपोर्ट पुन्हा तपासले जातात. 
शासनाकडून केलेल्या पुर्नतपासणीत खाजगी लँबच्या अहवालात काही तफावत आढळून आली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर निगेटिव्ह रुग्णांचे अहवाल नंतर पॉझिटीव्ह आढळले. मेट्रोपोलिस या लँबच्या टेस्टमध्ये हा गोंधळ दिसून आला. त्यामुळे त्यांचे काम तूर्तास थांबवले आहे.