पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर, उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर, उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ
__________________________________


कोरोनाचं संकट जगावर घोंगावतं आहे. भारतातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि पाकिस्तानातही. तरीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या कुरापती काढण्याची संधी पाकिस्तान सोडत नाहीये. याच कुरापतींना आज भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. तोफांनी अचूक मारा करत आणि गोळीचं उत्तर गोळीने देऊन पाकिस्तानातील दहशतवादी तळ, मोठ्या प्रमाणातला शस्त्रसाठा उद्धवस्त करण्यात यश मिळवलं. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. LoC जवळ अचूक निशाणा साधून पाकिस्तानी सेनेचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले.
भारतीय लष्कराने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी तळ, मोठ्या प्रमाणवर असलेला शस्त्रसाठा हा उद्ध्वस्त करण्यात आला. संरक्षण प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने या संदर्भातला ड्रोन व्हिडीओही ट्विट केला आहे.
जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शुक्रवारी सकाळी ११ पासून गोळीबार सुरु केला होता. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरु झाला होता. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी या उद्देशाने हा गोळीबार सुरु करण्यात आला होता. मात्र भारताने या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं. दशतवाद्यांचे तळ आणि त्यांच्याकडे असलेला शस्त्रसाठा यावर अचूक निशाणा साधत भारतीय लष्कराने ते उद्ध्वस्त केले.