संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे* *-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे*
*-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर*


पुणे, दि.४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी  साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.


डॉक्टर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्यासाठी एन 95 व सर्जिकल मास्क तसेच त्या अनुषंगीक साहित्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. साहित्य स्वरुपात ही मदत करावी,  ही मदत करतांना सोशल डिस्टन्स ठेवण्‍यात यावा तसेच मदत द्यायला जास्त लोकांनी येवू नये, तीन-चार लोकांनीच यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या वेबसाईटवरुनही मदत  करता येईल, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो.


           कोविड -19 (कोरोना व्हायरस) या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संस्था व विविध कंपन्या - सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- 95 मास्क, सॅनिटायझर, गॉगल, शु कव्हर, गम बूट, सोडियम हायपोक्लोराईट 5 टक्के द्रावण, फेस शिल्ड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर्स, पल्स ऑक्सिमीटर, मल्टी पॅरा मॉनिटर्स अशा वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागांस गरज असल्याने पुणे विभागातील 5 जिल्ह्यांतील मदत करणाऱ्या इच्छुकांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन एका पत्रकान्वये केले आहे. याकरीता डॉ. संजय देशमुख-मो.नं- 9422033439, डॉ. नंदा ढवळे- मो. नं- 9822428560, श्रीमती गौरी पिसे-  मो.नं- 9890408987, श्री. गिरीश कु-हाडे- मो.नं- 7798981199 भ्रमणध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधता येईल.


            पुणे विभागातील अन्नधान्य दान करणाऱ्या इच्छुकांनी पुणे जिल्हा श्री. भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013, श्रीमती अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 020-26123743, सातारा जिल्हा श्रीमती स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840, सांगली जिल्हा 1) श्रीमती वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512, कोल्हापूर जिल्हा श्री. दत्तात्रय कवितके जिल्हा पुरवठा अधिकारी 0231- 265579, सोलापूर जिल्हा श्री उत्तम पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003 यांच्याशी संपर्क साधावा किंवा ईमेल कळविण्याचे आवाहन केले आहे.
                                                         0000