जिल्हयातील तक्रारनिवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन*  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*जिल्हयातील तक्रारनिवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन*                           पुणे दि 1: कोरोना विषाणुतच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थितीत लागु करण्यात आली आहे. जिल्हयातील इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून  त्याचा नंबर   020- 26123371 /1077 टोल फ्री नंबर आहे. (नियंत्रण कक्ष 24 X 7 कार्यरत आहे. )  त्यावर  कोरोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी श्री.सुनिल गाडे, उपजिल्हाधिकारी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन परिस्थितीमुळे उदयोग व्यवसाय प्रभावित झाल्यामुळे कामगार विस्थापित / बेरोजगार व परराज्यातील अडकलेले कामगार या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या तक्रारींबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्षाचे फोन नंबर 020- 26111061 व मोबाईल नंबर 7517768603 असा असून या नंबरवरती कामगारांच्या तक्रारी  स्वीकारणार आहेत. सदर तक्रारींबाबत श्री. सुभाष बागडे, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली  आहे.
जेष्ठ नागरीक व दिव्यंगनासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष (020- 29706611) स्थापन करण्यात आला असून सदर नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी श्री.विजय गायकवाड,सहा.आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
श्री.नवल किशोर राम, जिल्हाधिकारी पुणे यांनी कोरोना विषाणुच्या अनुषंगाने  जिल्हयातील नागरीकांना तसेच कामगार, मजुर  व इतर कुठल्याही तक्रारीसाठी सदर नियंत्रण कक्षाकडे तक्रार देण्यात यावी व सदर तक्रारीचे तात्काळ निरसन व अंमलबजावणी सदर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येणार आहे.