नेरळ मध्ये येऊन व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांची ताकीद....  अनेकांचे पासेस रद्द

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळ मध्ये येऊन व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांची ताकीद.... 

अनेकांचे पासेस रद्द

कर्जत,ता.9 गणेश पवार

              नेरळ येथील बाजारपेठ मध्ये किराणा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अंबरनाथ, उल्हासनगर आणि ठाणे येथून येऊन व्यवसाय करतात आणि पुन्हा घरी परत जातात.त्यामुळे नेरळ गावात केल्या चार दिवस चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.तर पोलिसांनी उल्हासनगर मधून येणारी एक वेगेनार गाडी जमा केली आहे.दरम्यान,नेरळ मध्ये बाहेरून येऊन व्यवसाय करणारे यांना बंदी घालण्यात आली असून त्यांनी याच ठिकाणी राहावे असे आदेश जिल्हा पोलिस उपअधीक्षक यांनी दिले आहेत.

                  कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हा हद्द सील केल्या आहेत.त्याचवेळी मेडिकल अडचणी वगळता कोणालाही जिल्हा हद्द ओलांडू दिली जात नाही.त्याबाबत रायगड जिल्हा प्रशासन यांचा उद्देश अगदी योग्य आहे.त्यात कोरोना ची लागण कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात येऊ नये हा प्रयत्न शासनाचा आहे.नेरळ बाजारपेठ मध्ये व्यवसाय करणारे व्यापारी हे  व्यवसायानिमित्त नेरळ मध्ये येणे हे नेरळ गावासाठी अत्यन्त धोकादायक असून सध्या ठाणे जिल्ह्यातील अगदी बदलापूर पर्यंत कोरोना येऊन पोहोचला आहे.म्हणजे आपल्या वेशीवर कोरोना आला आहे आणि हे सहा ते सात व्यापारी त्यांना किराणा माल आणण्यासाठी टेम्पो चा परवाना नेरळ पोलीस स्टेशन मधून दिला आहे. तो आपल्या कार ला लावून ते दररोज नेरळ मध्ये येत आहेत आणि रात्री पुन्हा उल्हासनगर आणि ठाणे येथे जात आहेत.

                  असे असताना नेरळ गावात अथवा माथेरान मध्ये व्यवसाय करणारे काही व्यापारी हे जिल्हा हद्द दररोज ओलांडून जात आहेत आणि पुन्हा जिल्हा हद्द ओलांडून नेरळ मध्ये येत आहेत.त्यातील पाच जण नेरळ गावात व्यवसाय करतात तर दोघे माथेरान मध्ये जाऊन किराणा दुकानाचा व्यवसाय करतात.त्यात माथेरानमध्ये कोरोना चा संशयित रुग्ण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने तो निर्णय 18 मार्च रोजी घेतला आहे.तेंव्हा पासून माथेरान सर्वांसाठी बंद केले आहे,असे असताना दोन व्यापारी चक्क उल्हासनगर येथून येऊन व्यवसाय करीत आहेत.तर नेरळ मध्ये व्यवसाय करणारे यातील चार हे उल्हासनगर शहरातून तर एक ठाणे येथून दररोज नेरळ गावात येत आहेत.

                    याबाबत रायगड जिल्हा प्रशासन यांनी आधी त्यांना नेरळ येथे राहायला सांगितले आहे. त्याचवेळी त्यांना शेलू येथे असलेल्या रायगड जिल्हा हद्दीमधून सोडण्यात येऊ नये आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी दिले आहेत.त्याचवेळी त्यांना केवळ मालवाहतूक करण्यासाठी टेम्पो करिता दिलेले पासेस तपासून रद्द करण्याची कारवाई नेरळ पोलिसांनी आज सकाळीच केली.

                     त्याचवेळी उल्हासनगर येथून आज सकाळी नेरळ ला येत असलेले व्यापारी यांची वेगेंनार गाडी नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.त्याचवेळी पोलिसांनी किराणा मालाची वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेले पासेस देखील काढून टाकण्यात आले आहेत.पोलिसांच्या या कारवाई मुळे बाहेरून येणारे व्यापारी हवालदिल झाले असून यापुढे जिल्हा हद्द ओलांडून कोणताही व्यापारी जिल्ह्याची हद्द ओलांडून जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली