पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)*
दि. १२ एप्रिल २०२०
*मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा*
*_कोरोना विरोधातील लढ्याला समाजातील दातृत्वाचे पाठबळ_*
मुंबई दि १२:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व् संस्थानी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
या निधीत ८३ वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गत दोन दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.
या शिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावणे सुरू केले आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.
*मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19*
मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
*खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.*
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
*मराठीत-*
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
000