*या नंतर जागतिक मंदी येणार का?*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*या नंतर जागतिक मंदी येणार का?*


*(एक अत्यंत वाचनीय लेख)*👌👉


*पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं...* ♻✅


*आता खूप मोठी जागतिक मंदी येणार असे सर्वत्र बोलले जात आहे. मुळात मंदी म्हणजे काय ? गती नसणे ! गती म्हणजे काय ? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा वेग ! अधिक वेग कधी आवश्यक असतो ? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अत्यावश्यक असेल तेव्हाच ! यावरून आपल्याला कळलेच असेल की गेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये काही विशिष्ट वर्गांनी ठरवून लोकांच्या गरजा वाढवल्या आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी लोकांची गती वाढविली.* 
*गेल्या तीस वर्षांमध्ये आपण काय-काय अनावश्यक गोष्टी स्वीकारल्या होत्या हे आज आपल्याला वीस दिवस सलग घरी बसल्यावर लक्षात आले असेलच ! आपल्याला गाडी लागली नाही, पेट्रोल लागले नाही, चित्रपटगृहात जायची गरज पडली नाही, हॉटेलमध्ये जाण्याची गरज वाटली नाही, ऑनलाइन काही मागवावे लागले नाही, शेवटी गल्लीतला छोटा दुकानदारच कामाला आला.* 
*मग आपण गेली तीस वर्षे ग्लोबलायझेशनच्या नावाखाली जो काही धिंगाणा घातला होता तो नक्की काय प्रकार होता ? आज जगातील सर्वात मोठे भांडवलदार देश कसे भिकेला लागले आहेत हे आपण पाहतो आहोत ! समोरच्या माणसाला जितके परावलंबी बनवाल तितका तो तुमचा गुलाम होत जातो आणि तुमचा व्यवसाय वाढतो हे व्यवसाय वाढवण्याचे सोपे सूत्र आहे. गायछाप तंबाखू ज्यांना खावी लागते त्यांना विचारा ! तंबाखू शिवाय त्यांचे आयुष्य उत्तम जात असे, परंतु कोणीतरी येऊन चटक लावली आणि आता तर तंबाखू खाल्ल्या शिवाय त्यांना करमतच नाही.*
*तशाच अनेक अनावश्यक सवयी आपल्याला या भांडवलदार देशांनी लावल्या. यापूर्वी आपल्याकडे व्यवसाय नव्हते का तर असे अजिबात नाही. बारा बलुतेदार पद्धती ही स्थानिक व्यवसायाला पाठबळ देण्यासाठीच निर्माण झाली होती. त्यातून एखाद्या छोट्याशा गावाची अर्थव्यवस्था अगदी सुरळीतपणे चालत असे. आपल्याकडे पैशाला पैसा म्हणत नाहीत तर "अर्थ" म्हणतात, या अर्थातच सर्व अर्थ दडलेला आहे जीवनाचा. ज्या गोष्टीला अर्थ आहे त्याच गोष्टीसाठी खर्च करावा लागेल तो पैसा. बाकीचा सर्व अनर्थच !*
*आज आपण नीट निरीक्षण करून पहा. ज्या ज्या देशांनी भांडवलशाहीचा उदोउदो केला किंवा अगदी साम्यवादाचा अंगीकार केला ते सर्व आज अक्षरशः भिकेला लागले आहेत. कारण त्यांनी आपल्या देशातील सहज नैसर्गिक विनिमय व्यवस्था मोडून काढून नवी व्यवस्था उभी केली. निसर्गाला अनुरूप आणि निसर्गावर अवलंबून असलेले अर्थकारण बाजूला टाकत निसर्गाचा बळी घेणारे घातक अर्थकारण व त्याला पूरक असे राजकारण करत राहिले. केवळ तेला वरून झालेली गेल्या शतकातील युद्धं आठवा. आज कोणाला एक थेंबभर सुद्धा तेल लागत नाही हे सिद्ध झालेले आहे.* 
*न्यूयॉर्क शहर बंद करण्यास ट्रम्प यांचा विरोध का होता यामागचे कारण देखील तेच आहे ! ते असे म्हणत राहिले की न्यूयॉर्क बंद पडले तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. प्रत्यक्षामध्ये त्यांना अशी भीती होती की न्यूयॉर्क बंद पडून देखील जगाला काहीच फरक नाही पडणार हे सिद्ध होणार आहे ! त्यामुळे ते न्यूयॉर्कला बंद होऊ देत नव्हते !*
*इंग्लंड, इटली, स्पेन, फ्रान्स या सर्व इतरांना लुबाडून श्रीमंत झालेल्या तथाकथित प्रगत राष्ट्रांची देखील आज काय अवस्था झाली आहे आपण पाहतो आहोत ! जिथे मानवी भावभावनांना शून्य किंमत दिली जाते आणि पैसा आणि भोग हेच सर्वस्व होते तिथे याहून वेगळे काय होणार ?* 
*आज आपल्या इथले लोक लाखो रुपये खर्च करून युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वगैरे देश पाहायला जातात. आणि तिथली नगरे किती टापटीप आहेत व सुनियोजित आहेत याचे गोडवे गातात ! त्या सर्वांना माझे सांगणे आहे की आपण एकदा दक्षिण भारतात फिरावं. इथली शब्दशहा हजारो भव्यदिव्य मंदिरे व त्यांच्याभोवती वसवलेली आटोपशीर नेटकी शहरे पहावीत. आजही कुणाच्या बापाचा घास नाही इतकी भव्य स्ट्रक्चर्स इतक्या कमी वेळामध्ये उभे करण्याचा !*
*आपल्या इथे जी संस्कृती अत्यंत परमोच्च बिंदूवर नांदत होती तिचा सर्वनाश करुन या सर्व युरोपियन आणि अरबी राष्ट्रांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या व त्यावरच आज ती उभी आहेत.*


*जगाच्या पाठीवर असे फार कमी देश आहेत जिथे केवळ एका वस्त्रानिशी कुठल्याही ऋतूमध्ये निवांत राहता येते. भारत भूमी ही अशा सर्व भौगोलिक प्रांतांमध्ये श्रेष्ठ भूमी आहे कारण आपली संस्कृती अजूनही टिकून आहे.*
*आपल्या संस्कृतीने कधीच कोणाचा द्वेष केला नाही आणि कधीच पैशाला अवाजवी महत्त्व देखील दिले नाही. आपण लक्ष्मीला झाडूची उपमा दिली. याचा अर्थ तुझे स्थान घराबाहेर आणि ते देखील दु:खे दूरिते दूर करण्यापुरतेच मर्यादित आहे. घरांमध्ये फक्त विष्णुला स्थान ! आपले अनेक देव देखील वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत जसे साक्षात शिवशंकर !* 
*आज संपुर्ण करोनाच्या पार्श्वभूमीवर भारत देश ताठ मानेने उभा आहे याचे एकमेव कारण आपली उदात्त संस्कृती हेच होय. आज या महामारी मुळे आपल्याला काय काय कळले आहे ते लक्षात घेणे आवश्यक आहे.*


*चित्रपटांमध्ये डाव्या लोकांनी उभे केलेले हिरो-हिरॉईन हे खरे नव्हेत तर वेळप्रसंगी आपला जीव वाचवणारे व त्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्सेस, पोलीस दल आणि लष्कर हेच खरे हिरो आहेत.*
*सासु सुना मध्ये भांडणाचे बीज पेरणाऱ्या किंवा वासना चाळविणाऱ्या रियालिटी शो सारख्या मालिका ह्या आनंद देणाऱ्या नसून रामायण महाभारतासारखी महाकाव्यंच आपल्याला आंतरिक समाधान आणि जगण्याचे बळ देतात.*


*जगात जे जे म्हणून मोठे मोठे देश आपण मानत आलो ते सर्व आज भारतापुढे फारच खुजे ठरले आहेत.*
*दरवर्षी ठराविक टक्के अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे हा एक मोठा भ्रम असून स्थिर अर्थव्यवस्था राहू शकणे हेच खरे यश आहे.*🍃🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃
*एक छोटासा लेख, पण विचार करायला लावणारा.* 
🙏🙏🙏🌸🌷🌸


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image
कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image