वनराई तर्फे ग्रामीण महाराष्ट्रात जनजागृती आणि मदत कार्य*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट                                                                                                                                      *वनराई तर्फे ग्रामीण महाराष्ट्रात जनजागृती आणि मदत कार्य*
...........................
सातारा,पुणे,जालना,नासिक जिल्ह्यात किराणा आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप                                      --------------------------                                                                                                           *सर्कस कलाकार,शेतकरी,मजूर,वीटभट्टी कामगारांना मदत*  


पुणे :


कोरोना विषाणू साथ आणि लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर वनराई संस्थेतर्फे ग्रामीण महाराष्ट्रातील  सातारा, पुणे ,जालना, नासिक  जिल्ह्यातील   ग्रामीण भागात जन  जागृती  आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपद्वारे मदत कार्य करण्यात आले . किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्याचे सुमारे १ हजार गावकऱ्यांना वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
जालना,नासिक,पुणे,सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या लक्षणांबाबत,सुरक्षिततेबाबत जागृती करण्यात आली.याकरिता माहितीपर पोस्टर्सही लावण्यात आली.   


सातारा जिल्हयात लोणंद,पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात भूमिहीन शेतकरी, वीटभट्टी कामगार,परप्रांतीय मजूर व गरीबांना किराणा माल आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.खंडाळा(सातारा)येथे बेरोजगार झालेल्या सर्कस कामगार,कलाकारांना महिनाभर पुरेल इतका शिधा गरजू कुटुंबाना देण्यात आला.नासिक जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी भागात मदत देण्यात आली. ग्रामपंचायतींना जंतूनाशक फवारणीमध्ये मदत करण्यात आली. स्थानिक संस्थांबरोबर देखील मदतकार्य करण्यात आले. 
या जनजागृती व मदतकार्याच्या मोहिमेत जयवंत देशमुख,सतीश आकडे,नीलिमा जोरवर,ज्ञानेश्वर सरडे,मांगीलाल महाले इत्यादी स्वयंसेवक,पदाधिकारी सहभागी झाले.


विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ति व संस्थांनी या सामाजिक कार्यासाठी वनराई संस्थेला मदत केली. 


................................................