सर्वेक्षणाचे कामास अनुपस्थितीबाबत  बारा उपशिक्षकांचे निलंबन,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
२८०४/२०२०,
 सर्वेक्षणाचे कामास अनुपस्थितीबाबत  बारा उपशिक्षकांचे निलंबन,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत मनपा प्रशासनाकडून विविध कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत,विविध स्तरावर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत,
अशा परिस्थिती विनासुचना रजा घेणे,कार्यालयीन आदेश न पाळणे याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना देउनही त्यांचेवर सोपविण्यात आलेले सर्वेक्षणाचे कामे न केल्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण झाले,
या कारणास्तव पुणे मनपा शिक्षण मंडळाकडील संबंधित उपशिक्षक यांनी कार्यालयीन आदेशानुसार परिमंडळ उपायुक्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय स्तरावर नागरी  सर्वेक्षणाकरिता डॉ,वैशाली जाधव,सहाययक आरोग्य अधिकारी यांचेकडे कामास हजर होणे आवश्यक होते,तथापि सदरचे उपशिक्षक हजर झाले नाही,व कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतरही खुलासे देण्यात आले नाही,अशाप्रकारचे शिस्तभंग व गैरवर्तनामुळे संबंधीत बारा उपशिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे मा,रुबल अगरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) यांनी कळविले आहे,
सहपत्र -- 
कार्यालयीन आदेशाची प्रत,
-संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
२८/०४/२०२०,