सरकारने १९२१ या क्रमांकावरुन देशातील जनतेला कॉल करुन आरोग्यबाबतची माहिती विचारण्याचा निर्णय घेतला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सरकारने १९२१ या क्रमांकावरुन देशातील जनतेला कॉल करुन आरोग्यबाबतची माहिती विचारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून येणाऱ्या कॉलवर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता विचारला जाईल. तसेच तुम्ही जर परदेशात प्रवास केला असेल तर या प्रवासाबद्दलची माहिती विचारली जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील सदस्याला किंवा तुमच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही असा प्रश्न देखील सरकारकडून आता या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विचारला जाणार आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून टेलीफोनिक सर्वेक्षण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.