पुणे विभागात कोरोना बाधित 726 रुग्ण*        *विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे विभागात कोरोना बाधित 726 रुग्ण*
       *विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*
     
    पुणे दि.19:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 726 झाली असून विभागात 82 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 591 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 726 बाधित रुग्ण असून 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 666 बाधीत रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर  जिल्हयात 7 बाधीत रुग्ण आहेत. 
  आजपर्यंत विभागामध्ये एकूण 9 हजार 43 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी   8 हजार 304 चा अहवाल प्राप्त आहे. 684 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 7 हजार 586 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 726 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 41 लाख 23 हजार 708 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 55 लाख 64 हजार 478 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 819  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
0000


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image
कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image