पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट.
दि. १५/०४/२०२०
प्रति.
मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
मुंबई..
द्वारा
मा.जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.
विषय : कराड तालुक्यामधील रेशन दुकानदारांचा परवाना रद्द करून कडक व तातडीने कारवाई करण्याबाबत.
मा.महोदय,
मी सागर भारत साळुंखे-अध्यक्ष कराड तालुका,तसेच रोहित पंडित (सुतार)-संपर्कप्रमुख कराड तालुका,विशाल डोंगरे- संघटक कराड तालुका,अक्षय खाडे-सरचिटणीस कराड तालुका,सुजित लादे-कार्याध्यक्ष कराड शहर,कृष्णत तुपे-उपाध्यक्ष कराड तालुका,सिद्राम कसकी-संघटक कराड शहर आदी
आपणास,
छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने या निवेदनाद्वारे विनंती करु इच्छितो की,
आज एकीकडे महाराष्ट्रासह देशात किंबहुना जगात न दिसणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे एकच धुमाकूळ घातला असताना,करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने कराड तालुक्यामध्ये काही रेशनिंग दुकानदारांची अन्नथान्याचा अपहार तसेच नागरिकांची आर्थिक लुबाडणूक चालू आहे.
कराड तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार हे रेशनकार्ड धारकांना धान्य कमी वाटप करत आहे.त्याचबरोबर त्याची कसलेही नोंद ठेवत नाही, व कार्ड धारकांशी उद्धटपने बोलत आहे.
अशा कार्डधारकांच्या व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येत आहे. तरी आपण प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी.गोरगरीब लाभार्थ्यांना वेळेत रेशनिंग मिळणेसाठी सर्व गावकामगार तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना रेशनिंग दुकानांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्या.
कराड तालुक्यामध्ये सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात रेशनधारकांना शासनाने दिलेल्या साठ्यापेक्षा कमी धान्य देण्यात येत आहे. आलेल्या धान्याची व वाटप धान्याची नोंद ठेवली जात नाही.भाव फलकावर कसलेही भाव लिहिले जात नाही, त्याचबरोबर स्टॉक पत्रक भरले जात नाही.आणि आलेल्या रेशनकार्ड धारकांशी उद्धटपने बोलले जात असल्याच्या अनेक तक्रारी कराड तालुक्यातील रेशन धारकांच्या येत आहे.
त्यानुसार मंडलाधिकारी,पुरवठा अधिकारी, तलाठी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी भेटी देऊन संबंधित दुकानदारांची कानउघाडणी करून अशा दुकानदारांचा कायमचा परवाना रद्द करण्यात यावा.देशात आणीबाणी चालू आहे. देशात लॉकडाऊन झाल्याने गरिबांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे,अशा काळात त्यांना रेशन धान्य वेळेत व सरकारने दिलेल्या वजनात ते मिळणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने प्रशासनाकडून रेशन धान्य वेळेत वाटप केले गेले आहे.तरी सुद्धा कराड तालुक्यात अनेक रेशन दुकानात कार्डधारकांना राशन पूर्ण क्षमतेने मिळत नाही.कराड तालुक्यातील अनेक गावातील रेशन दुकानाच्या बाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेली पापे धुवून टाकण्याची वेळ आली आहे.
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांना गावागावातील व शहरातील सीमा बंद केल्या आहेत, त्यामुळे अनेक गरजू व गरिबांना धान्य मिळत नाही शिवाय त्यांचा रोजगार बंद आहे, अशा नागरिकांना काही दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांकडून धान्य दिले जात आहे.
अशा दुकानावर व दुकानदारावर मोठी व कडक कारवाई करून सरकारने आपले कर्तव्य पार पाडावे ही नम्र विनंती.
आपला :
सागर भारत साळुंखे
अध्यक्ष कराड तालुका
छावा क्रांतिवीर सेना,
महाराष्ट्र राज्य.