*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*२३ मार्चपासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये.*
*नागपूर :* *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ‘२३ मार्चपासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये. सगळे वीज बिल अॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडित करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीजचोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये. ’ अशा सूचना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.*