कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू*    

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू*                           पुणे दि: 1: कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतीरीक्त प्रति सदस्य प्रति महा 5 किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडुन आदेश प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
 पुणे जिल्हा ग्रामिण भागासाठी माहे एप्रिल, मे व जुन 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार माहे एप्रिल 2020 करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता 23 किलो गहु व 12 किलो तांदुळ तसेच माहे मे व जुन 2020 या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता 25 किलो गहु व 10 किलो तांदुळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रती लाभार्थ्यांकरीता दरमहा 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत 2 रुपये प्रति किलो तर तांदुळ 3 रुपये प्रति किलो आहे.
 माहे एप्रिल, मे व जुन 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रति महा 5 किलो या प्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतरावरून  अंतर ठेवत धान्य घ्यावे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री. गायकवाड यांनी केले आहे.


    0000