पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*तमाच्या तळाशी दिवे लागले रे* . . .
🌺🌺🙏🌺🌺
कोणत्याही सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत, प्रथम झळ बसणारा, भरडला जाणारा घटक हा हातावर पोट असणारा, तळागाळातील माणूसच असतो.जिमखाना भागातील झेड ब्रीजच्या खाली,रीतसर नोंदणी असलेल्या, पंचेचाळीस मजूरांच्या झोपड्या आहेत. त्यांची हालात समजताच, प्रथम मदतीसाठी धावून गेले ते नवयुग मंडळाचे कार्यकर्ते !
नियोजनबद्धतेने मंडळाने प्रथम तीन दिवस, जेवणाची तयार पाकीटे देऊन, आज, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते, दहा दिवस पुरेल असा शिधा, प्रत्येक झोपडीत समक्ष दिला आहे.
भुकेल्या बालबच्चे मंडळींच्या चेह-यावर,आजच आम्ही, दिवाळीचा आनंद पाहिला. आमच्या कार्याची ती पावतीच होती. मानवतेच्या मंदीरात, दिवे उजळताना पाहून, लोकमान्यांच्या उद्दीष्टाला जागल्याचे मनस्वी समाधान लाभले होते.
*दिवे लागले रे, दिवे लागले* . . .
*तमाच्या तळाशी दिवे लागले रे* . . या शब्दांची अनुभूती, आम्हाला इथेच प्रत्ययास आली होती !
🌺🌺🙏🌺🌺
आनंद सराफ