डॉ,आपल्या दारी ",

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
३१/०३/२०२०,


पुणे मनपाच्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद,
पुणे:-सद्धयस्थितीमधील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रतिबंधाकरिता पुणे महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत, 
पुणे महापालिकेच्या या लढयास सर्व स्तरावरून सहकार्य व पाठबळ मिळत आहे,
मनपाच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंद्धा करिता वैद्यकीय साधन सामुग्री उपलब्ध होण्याकरिता नागरिक,विविध संस्था, स्वयंसेवी संस्था,विविध आस्था पना, औद्योगिक आस्थापना,अशा घटकांकडून सोशल रिस्पॉन्सीबिलिटी ( सी एस आर ) अंतर्गत मदत उपलब्ध करून देणेबाबत आवाहन मा,महापौर मुरलीधर मोहोळ,व महापालिका आयुक्त  मा,शेखर गायकवाड यांनी अलीकडे नुकतेच केले होते,
सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मा,आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनपा आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱयांना १०,००० डिस्पोजलस मास्क दिले, वास्तू रचनाकार संदीप महाजन यांनी १०,व्हील चेयर व विकसक नितीन देशपांडे यांनी  ५०,नेबुलाईझर ( कफ निर्मूलन करणेकरिता ) व प्रिन्सिपल ग्लोबल साई सर्विसेस,मगरपट्टा,हडपसर यांचे वतीने सुमारे ४३,७०७ मास्क उपलब्ध करून दिले, 
मनपा मुख्य भवनात सदरचे वैद्यकीय साहित्य मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वीकारले,
याप्रसंगी मा,अतिरिक्त मनपा आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल,मा,अतिरिक्त मनपा आयुक्त शांतनू गोयल,मा,आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे,सहाययक आरोग्यप्रमुख डॉ, अंजली साबणे,उपायुक्त राजेंद्र मुठे,उपायुक्त सुनील इंदलकर,कार्यकारी अभियंता दिनेश गिरोला,उपस्थित होते,
११,मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनच्या मदतीने पुणे शहरात आरोग्य तपासणी उपक्रमाची सुरवात,
फोर्स मोटर्स व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता पुणे मनपा हद्दीमधील नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता " डॉ,आपल्या दारी ", या उपक्रमाची सुरुवात मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते उद्या सकाळी मनपा मुख्य भवनात,सकाळी ११,वाजता सुरू होईल,
सदरप्रसंगी मा,महापालिका आयुक्त, शेखर गायकवाड, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, व विलास राठोड,व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महापालिका


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image