नेरळमधील टॅक्सीचालक 300 कुटुंबाचे राज्याच्या पर्यटन मंत्र्यांना साकडे आदित्य ठाकरे यांना ट्विट करून  दिली माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळमधील टॅक्सीचालक 300 कुटुंबाचे राज्याच्या पर्यटन मंत्र्यांना साकडे

आदित्य ठाकरे यांना ट्विट करून  दिली माहिती

कर्जत,ता.12  गणेश पवार

                              नेरळ गाव हे माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचे प्रवेशद्वार समजले जाते.नेरळ च्या मागे डोंगरावर उभ्या असलेल्या माथेरानला जाण्यासाठी प्रवासी  टॅक्सीची व्यवस्था आहे.हा व्यवसाय करणारे टॅक्सी चालक हे नेरळ गावातील तरुण असून या व्यवसायावर अवलंबून असलेले 300 कुटुंब आज महिना होत आला उपासमारीच्या स्थितीत आहेत.माथेरान हे पर्यटन स्थळ बंद असल्याने रोजगार नाही, त्यामुळे टॅक्सी चालकांना शासनाने मदतीचा हात पुढे करावा मागणी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करून करण्यात आली आहे.

                            पूर्ण देश कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आला आहे,त्यामुळे सर्व व्यवसायांवर गदा आली असून देशाची मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असलेला पर्यटन व्यवसाय कोलमडून गेला आहे.त्यात माथेरान हे पर्यटन स्थळ नेरळ गावचे प्रवेशद्वार समजले जाते.त्या मुळे 1980 च्या दशकात माथेरान ला पर्यटक येऊ लागले तेंव्हापासून नेरळ मधील तरुणांनी टॅक्सी व्यवसाय सुरू केला आणि आज या व्यवसायावर अवलंबून असलेली 400 कुटुंबे नेरळ मध्ये आहेत. लॉक डाऊन मुळे कर्जत तालुक्यात माथेरान येथे पर्यटन बंदी असल्याने नेरळ-माथेरान टॅक्सी चालकांचे रोजगार बंद झाले आहेत. नेरळ व आजूबाजूच्या गावातील 300-400 टॅक्सी या मार्गांवर आपला रोजगार कमवून घर चालवत आहेत. 

                              माथेरान हे पर्यटन स्थळ 18 मार्च पासून बंद आहे आणि त्यानंतर तेथे जाणारे पर्यटक यांना येणे बंद केल्याने टॅक्सी व्यवसाय ठप्प झाला आहे.नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम यांनी आपल्या संघटनेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी डॉ निधी चौधरी यांनी पत्र पाठवून टॅक्सी चालक यांची स्थिती पाहून शासनाने मदत करावी असे आवाहन केले होते.तर मागील दीड महिना बंद असल्याने आणि येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये पर्यटक न येण्याने नेरळ व आजूबाजूच्या  गावातील टॅक्सी चालक यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे नेरळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे आवाहन केले आहे.तशा आशयाचे निवेदन राज्याचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करण्यात आले आहे अशी माहिती नेरळ काँग्रेसचे अध्यक्ष यतीन यादव,कार्याध्यक्ष संतोष पेडामकर आणि माजी अध्यक्ष संदीप सोनटक्के यांनी दिली आहे.