गरजू रुग्णांसाठी'मोबाईल डीस्पेन्सरी'ची पेठांमध्ये वैद्यकीय सेवा*          

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*गरजू रुग्णांसाठी'मोबाईल डीस्पेन्सरी'ची पेठांमध्ये वैद्यकीय सेवा*                                                                  -----------------------                                                                                                                     *भारतीय जैन संघटना,युनानी मेडिकल कॉलेज कडून वैद्यकीय मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे पथक* 
पुणे :
कोरोना लॉक डाऊन काळात पुण्यातीलगरजुंना मोफत आणि फिरती वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि आझम कॅम्पस मधील झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजकडून मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.या मोबाईल डीस्पेन्सरी द्वारे मंगळवारी कसबा पेठ,रास्ता पेठ,नाना पेठ,कागदीपुरा,चांद तारा मशीद परिसरात गरजू रुग्णांना उपचार सेवा देण्यात आली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
 या वैद्यकीय पथकात २५ डॉक्टर्स आणि ५ सुसज्ज रुग्णवाहिका आहेत.१५ एप्रिल पासून या पथकाने कामास सुरुवात केली आहे.आझम कॅम्पस (पुणे कॅम्प)येथे असलेल्या युनानी महाविद्यालयात या पथकाला कामाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी डॉ.पी.ए.इनामदार,अबेदा इनामदार, डॉ.मुश्ताक मुकादम,डॉ.नाझीम शेख,प्राचार्य जलिस शॆख उपस्थित होते.या पथकाचे नेतृत्व डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याकडे आहे.युनानी महाविद्यालयाच्या आणखी आजी,माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यानी या कोरोना विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले आहे.शासकीय यंत्रणेशी समन्वय करून हे पथक सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा,तपासण्या,उपचारांसाठी कार्यरतआहे,असे त्यांनी सांगितले.
आतापर्यत येरवडा,भीमनगर,कोंढवा,शिवनेरीनगर,मध्यवर्ती पेठांमध्ये या पथकाने वैद्यकीय सेवा दिली.शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जैन संघटना आणि झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याशी 9922404536 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------