पुणे विभागात 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक* *विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे विभागात 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक*


*विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*
 


        पुणे, दि.4 : पुणे विभागात अंदाजे 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची मार्केटमध्ये आवक झाली आहे. विभागात भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा-बटाटयाची आवक 9 हजार 168 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.


            पुणे विभागात 3 एप्रिल 2020 रोजी 101.84 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.70 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


   ००००
दि.4 एप्रिल 2020
दुपारी 4 वाजता