फार्मसी विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्ससिंग चा सोशल मीडियातून अभिनव प्रचार

पुणे प्रवास न्युज पोर्टल


 


प्रेस नोट


*फार्मसी विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्ससिंग चा सोशल मीडियातून अभिनव प्रचार!*


पुणे:


 महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ ऑफ फार्मसीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून  कोरोना विषाणूपासून बचावासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे संदेश अभिनव पद्धतीने सोशल मीडियावर दिले जात आहेत.


 प्राचार्य डॉ. किराण भिसे  यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.' स्टे होम, स्टे सेफ' या इंग्रजी संदेशांमधील प्रत्येक अक्षराचे पोस्टर तयार करून त्याची सेल्फी या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अपलोड केली आहे. त्याच बरोबर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांचे संवाद वापरून सुरक्षित अंतर ठेवण्याचा संदेश सर्वापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. 


राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. तसेच रजत सय्यद च्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
................................................