पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध*
*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती*
*विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा*
पुणे, दि.31: पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. मार्केट मध्ये विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची तर 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
पुणे जिल्ह्यात 4 हजार 473 मेट्रिक टन धान्यसाठा, सातारा जिल्ह्यात 4 हजार 88 मेट्रिक टन, सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 354 मेट्रिक टन, सांगली जिल्ह्यात 5 हजार 463 मेट्रिक टन, कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 582 मेट्रिक टन धान्यसाठयाची आवक झाली आहे. विभागात 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 12 हजार 458 क्विंटल भाजीपाला, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 315 क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्यात 1हजार 204 क्विंटल, सांगली जिल्ह्यात 1 हजार 848 क्विंटल, सातारा जिल्ह्यात 1 हजार 505 क्विंटल भाजीपाला आवक करण्यात आला आहे. विभागात 3 हजार 842 क्विंटल फळांची तसेच 11 हजार 122 क्विंटल कांदा- बटाट्याची आवक झाली आहे. विभागात 18 हजार 535 क्विंटल अन्नधान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. विभागात 89.14 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.32 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असून उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
00000